भाई गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर, परंतु चिंताजनक
रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याचे वृत्त खोटे आहे. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनकच असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पित्ताशयाचे ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सांगोल्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. अनेकांनी खात्री न करता सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र थिंक टँक लाईव्हच्या टीमने माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनकच असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.