भाईची देवराई भविष्यात ई-देवराई साकारणार : मा. सहा.पोलिस आयुक्त भरत शेळके
भाईच्या देवराईसाठी सतत मदतीचा हात; डॉ. नानासाहेबांची त्यागी वृत्ती प्रेरणादायी
सांगोला : भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ डिकसळ येथे साकारण्यात आलेल्या “भाईंची देवराई” हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. डॉ. नानासाहेब हालंगडे यांची त्यागी वृत्ती प्रेरणादायी आहे. ‘भाईंची देवराई’ ही भविष्यात ‘ई-देवराई’च्या रुपात नावारूपास येईल, असे प्रतिपादन माजी सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके यांनी केले.
शेळके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी डिकसळ येथ् भाईंच्या देवराईस सदिच्छा भेट दिली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील वकिल सुनील जगधने, कवी जगदिश मागाडे आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. नाना हालंगडे यांनी भरत शेळके व त्यांच्या सहकार्यांचा फेटा बांधून सत्कार केला.
देवराईची पाहणी केल्यानंतर शेळके यांनी डॉ . नानासाहेब हालंगडे यांच्या कार्याचे कौतुक केले. सत्कारास उत्तर देताना शेळके म्हणाले की, भाईंची देवराई या उपक्रमाबाबत मी मागील महिनाभरापासून एेकत होतो. आज या उपक्रमास भेट देण्याचा योग आला. हा उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहे. या ठिकाणी विविध जातींची लावलेली झाडे पर्यावरणाचे रक्षण करणार आहे. ऑक्सिजनचीही निर्मिती यातून होणार आहे. एखाद्या निस्पृह नेत्याच्या नावे पर्यावरणपूरक असणारा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न असावा. डॉ. नानासाहेब हालंगडे यांची त्यागी वृत्ती प्रेरणादायी आहे. या उपक्रमास मी आगामी काळात शक्य ती मदत करेन. ही देवराई आधुनिक रुपात विकसित होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. आगामी काळात ही देवराई ‘ई-देवराई’ बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी या प्रकल्पाचे मुख्य संयोजक पत्रकार डॉ. नानासाहेब हालंगडे, रासप जिल्हाध्यक्ष सोमा (आबा) मोटे,वतुकाराम भुसनर सर, विनायक कुलकर्णी सर,लमधुकर गोरड सर, श्रीपती वगरे सर, बंडू वाघमोडे, अप्पा भुसनर, दादासो भुसनर, सोपान करांडे, शंकर पाटील, बापू करांडे, रविकिरण साबळे, जगदीश मागाडे, काकासो करांडे, संदीप करांडे, संदीप भुसनर, राजू गेजगे सर आदी उपस्थित होते.
प्रत्येक महिन्यात होणार बैठक
भाईंची देवराई या उपक्रमास समाजातील दानशूर लोकांकडून सहकार्य मिळत आहे. येथे लागवड केलेली रोपेही रूजत आहेत. दानशूर व्यक्ती तसेच या प्रकल्पस्थळी काम करणा-या कार्यकर्त्यांमध्ये संवाद घडून यावा यासाठी येथे दर महिन्याच्या दहा तारखेला भाईंच्या वनराईचा वाढदिवस व बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती डॉ. नाना हालंगडे यांनी दिली.
- हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यात शनिवारी होणार २ लाख लसीकरण
- सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा शिवलिंग हाती घेतलेला पुतळाच योग्य : माजी मंत्री अण्णा डांगे
- डॉ. सुशीलकुमार मागाडे यांचा बेस्ट टिचर पुरस्काराने सन्मान
- आकाश ठोसरने जिंकली सोलापूरकरांची मने
- वारकऱ्यांना मिळणार दरमहा पाच हजार मानधन
- काय सांगता? फक्त ५०० रुपयांत Jio चा नवा स्मार्टफोन!