भाईंच्या देवराईस पाचशे क्विंटल गांडूळ खत
चि.यशराजे पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य
सांगोला/ नाना हालंगडे
चिरंजीव यशराजे सुरेश पवार वाटंबरे यांच्या 13 व्या वाढदिवसानिमित्त यशराजे अॅग्रो फार्मिंग कंपोस्ट या स्वतःच्या प्रकल्पातील 500 क्विंटल गांडूळ खत डिकसळ येथील भाईंची देवराई यास देऊन वाढदिवस साजरा केला याचे सर्वजणांनी कौतुक केलेले आहे. त्याचे वाटप भाई गणपतराव देशमुख यांच्या निवास्थानी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गटनेते आनंदा माने, पप्पू धनवजीर (मा.उपनगराध्यक्ष), मुलाचे वडील सुरेश पवार, प्राध्यापक मिलिंद पवार, बलभीम पवार, संजय पवार , विनायक पवार, संतोष निकम उपस्थित होते.
चिरंजीव यशराजे सुरेश पवार इयत्ता सातवी राहणार वाटंबरे यांनी 13 वा वाढदिवस यश राजे अग्रो फर्मिंग कंपोस्ट या स्वतःच्या प्रकल्पातील 500 क्विंटल गांडूळ खत डिकसळ येथील भाईंची देवराई यास देऊन वाढदिवस साजरा केला. याचे सर्वजणांनी कौतुक केलेले आहे.
त्याचे वाटप भाई गणपतराव देशमुख यांच्या निवास्थानी डॉक्टर बाबासाहेब देशमुख गटनेते आनंदा माने,पप्पु धनवजीर यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुलाचे वडील सुरेश पवार, प्राध्यापक मिलिंद पवार, बलभीम पवार, संजय पवार, विनायक पवार, संतोष निकम सर्वजण राहणार वाटंबरे तसेच प्रा. किसन माने प्राध्यापक अशोकराव शिंदे, पत्रकार नाना हलंगडे ,अॅड सचिन गव्हाणे, सुनिल पवार, निलेश अनुसे, तुकाराम भुसनर, बिभीषण सावंत उपस्थित होते.