‘भाईंच्या देवराई’साठी नगरपालिकेतर्फे मदत करणार : नगराध्यक्षा राणीताई माने
सांगोला (संदिप करांडे) : ‘भाईंची देवराई’ हा प्रकल्प आदर्शवत असाच आहे. डॉ. नाना हालंगडे यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. एखाद्या लोकनेत्यांच्या नावे समर्पित असणारा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असावा. या प्रकल्पाच्या ठिकाणी सांगोला नगरपालिकेतर्फे हायमास्ट दिवे बसवून देऊ. स्वच्छ भारत अभियानातून नगरपालिकेतर्फे शक्य ती मदत करू, असे अभिवचन सांगोला नगरपालिकेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने यांनी दिले.
नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने यांनी सोमवारी डिकसळनजिक असलेल्या “भाईंची देवराई” या अभिनव प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका छायाताई मेटकरी उपस्थित होत्या. नगराध्यक्षा राणीताई माने व नगरसेविका छायाताई मेटकरी यांचा सत्कार सौ. महादेवी नाना हालंगडे यांनी केला. यावेळी श्रीपती वगरे सर, शेखर गडहिरे, मुख्याध्यापक तुकाराम भुसनर, पारेचे माजी सरपंच मधुकर गोरड, राजू गेजगे सर, मुख्याध्यापक श्रीपाद कुलकर्णी, संतोष करांडे, बंडू वाघमोडे, संदीप करांडे, आप्पासो भुसनर, संदीप भुसनर, बापू करांडे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने यांनी ‘भाईंची देवराई’ या प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प अतिशय शाश्वत व कौतुकास्पद आहे. सांगोला तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातला हा पहिला प्रकल्प आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. स्वच्छ भारत अभियानातून नगरपालिकेतर्फे मदत करू. देवराईत हायमास्ट दिव्यांची सोय करू, असे त्या म्हणाल्या.
यावेळी ‘भाईंची देवराई’ प्रकल्पाचे संयोजक डॉ. नाना हालंगडे उपस्थित होते.
—————
स्वच्छ भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक सचिन सोनवणे यांची भेट
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक सचिन सोनवणे यांच्यासह चाेखामेळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास पवार यांनीही सोमवारी “भाईंची देवराई” प्रकल्पास भेट दिली. हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकल्पास शासनाकडूनही मदत मिळते. ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी ‘भाईंची देवराई’ प्रकल्पाचे संयोजक डॉ. नाना हालंगडे उपस्थित होते.
हेही वाचा
“चिंच विसावा” कृषी पर्यटन केंद्र बनलंय पर्यटकांचं आकर्षण
इंचभर जमिनीसाठी वाद होतात, डॉ. नाना हालंगडेंनी मात्र २ एकर समर्पित केली
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सांगोला दौरा
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला