भाईंच्या देवराईमुळे गावाचे नाव उज्ज्वल : अॅड. विश्वास गायकवाड

सांगोला बार असोसिएशनच्या वतीने मदत करणार

Spread the love

सांगोला/ विशेष प्रतिनिधी
गावाचे नाव उज्ज्वल करण्यास चांगली माणसे धडपडत असतात,त्याचेच मूर्तिमंत उदाहरण नाना हालंगडे हे आहेत. त्यांची त्यागी वृत्ती सर्वानसाठी प्रेरणादायी आहे,आज यांनी २ एकर जमीन देवून, भव्यदिव्य भाईंची देवराई साकारली आहे, त्यामुळे डिकसळ गावाचे नाव उज्ज्वल झाले असल्याचे सांगोला बार असोसिएशचे अध्यक्ष अॅड. विश्वास गायकवाड यांनी गौवोद्गार काढले.

रविवार दि.२४ ऑक्टोंबर रोजी डिकसळ गावामध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सांगोला बार असोसिएशने भाईंच्या देवराईला भेट दिली. संपूर्ण देवराईची पाहणी केली. यावेळी पुढे बोलताना अॅड. गायकवाड म्हणाले की, राज्यामध्ये आदर्श निर्माण केलेल्या भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याचा चौफर विकास केला. त्याच्या या विकासाच्या कामामुळे व त्याच्या निधनानंतर पत्रकार नानाने जी देवराई साकारली ही गावाची ओळख आहे. याचं देवराईतील विविध जातीचे वृक्ष, येथील हवामान, संपूर्ण परिसर अतिशय मनमोहक आहे, भवीश्यात याला वेगळेच रूपही येणार आहे. आम्ही सर्व मंडळी याबदल जाणून होतो. पण आज भेट दिल्यानंतर अगदी प्रसन्न वाटले. या देवराईसाठी सांगोला बार असोसिशनच्या वतीनेही भरीव अशी मदत करणार असल्याचे अॅड. गायकवाड यांनी शेवटी सांगितले,यावेळी खरेदी_विक्री संघाचे संचालक तुकाराम भुसनर, अॅड. आनंदा बनसोडे,अॅड.बनकर, अॅड. बाबर,अॅड. कुलाल यांच्यासह अन्य वकील मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका