भाईंच्या देवराईत वृक्षारोपण
डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात
थिंक टँक / विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील भाईंच्या देवराईत देवराईचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देमेमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वृक्षारोपण,आश्रम तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खाऊचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सांगोला तालुक्याचे युवक नेते, भावी आमदार, युवकांचे आयडॉल, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त सकाळी आश्रम शाळेतील सहाशे मुलांना खाऊचे वाटप तसेच जिल्हा परिषद शाळेतील 50 मुलांनाही याचे वाटप पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
सायंकाळी चारच्या सुमारास भाईंच्या देवराईमध्ये युवकनेते तसेच पुरोगामीचे अध्यक्ष शेखरभाई साळुंखे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. हीच देवराई स्व.आम डॉ.गणपतरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आली असून ही चांगल्या प्रकारे बहरली आहे.
हीच एक अनमोल ठेव असून,राज्यात नावारूपास आलेली आहे. आज येथेच डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी दादासाहेब भुसनर सर संतोष करांडे, काकासाहेब करांडे, रावसाहेब निळे, दादासाहेब करांडे, महादेव गोरड, पप्पू गोरड, मधुकर बाबर सर, यांच्यासह पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.