भाईंच्या देवराईतील स्वागत कमानीचे सोमवारी उद्घाटन
धनगर समाजसेवा मंडळाने दिली स्वागत कमान
सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे स्व.भाई आम. गणपतरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ भाईंची देवराई साकारण्यात आलेली आहे. येथे सांगोला येथील धनगर समाज सेवा मंडळाने भव्य स्वागत कमान उभी केली आहे. या कमानीचे उद्घाटन सोमवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती तुकाराम भूसनर यांनी दिली.
- सर्वाधिक वाचलेली बातमी :
- ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
भाईंच्या देवराईच्या भव्य स्वागत कमानीचे उद्घाटन सोमवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रमुख पाहुणे डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते, नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या अध्यक्षतेखाली तर कै. भाई गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र भाई चंद्रकांत देशमुख, युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख,गटनेते तथा नगरसेवक आनंदभाऊ माने, जिल्हा परिषद सदस्य अतुल (मालक) पवार, रासप जिल्हाध्यक्ष_ सोमा(आबा) मोटे, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष-दत्ताभाऊ जानकर,
उपाध्यक्ष दत्तात्रय बंडगर, सचिव बंडोपंत येडगे, खजिनदार राजाभाऊ मदने, संचालक सुरेश कोळेकर, कामाजी नायकुडे, युवराज माने, बिरुदेव शिंगाडे, दिलीप नरुटे, ज्ञानेश्वर गाडेकर, भिवा मेटकरी, सुरेश गावडे, बाळासाहेब व्हटे, भीमराव देवकते, दिलीप मस्के, सल्लागार, प्रा. संजय शिंगाडे, बाळासाहेब गावडे, चिंतामणी माने, संदिपान नरुटे, आनंदा व्हटे, बापूराव जानकर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भाईंची देवराई प्रतिष्ठान, डिकसळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
दत्ताभाऊ जानकर यांनी शब्द पाळला
भाईंच्या देवराईची पाहणी करण्यासाठी धनगर समाज सेवा मंडळाचे सांगोला अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर हे मागील काही महिन्यांपूर्वी देवराईत आले होते. त्यावेळी त्यांनी देवराईचे शिल्पकार तथा पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांना देवराईसाठी स्वागत कमान बांधून देण्याचा शब्द दिला होता.
तो शब्द धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर यांनी पाळला. त्यांनी v त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांत कमानीचे काम सुरू केले. ते काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याचे आता उद्घाटन करण्यात येत आहे.
‘भाईंची देवराई’ आदर्शवत प्रकल्प
आमदार कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डिकसळ (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी स्वताच्या २ एकर जागेमध्ये 10. ऑगस्ट 2021 रोजी ‘भाईंची देवराई’ हा आदर्शवत प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पात विविध प्रकारची 1120 झाडे लावण्यात आली आहेत. या कामाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. एखाद्या नेत्याच्या नावाने साकारण्यात आलेला राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. घेरडी-जत मार्गावर निसर्गाच्या कुशीत वसलेला हा प्रकल्प पाहण्यासाठी लोकांची वर्दळ वाढत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी भेट देत आहेत. आगामी काळात हे ठिकाण वन पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण बनणार आहे.
सोमवारीच सीईओ दिलीप स्वामी देणार भेट
सीईओ दिलीप स्वामी यांनीही यापूर्वीच या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार ते सोमवार, १ नोव्हेंबर रोजी देणार भाईंच्या देवराईला भेट देणार आहेत.