भयानक : तब्बल १४ काळवीटं पुलावरून उडी मारल्यानं ठार
सोलापूरजवळील थरारक घटना
थिंक टँक / नाना हालंगडे
सोलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या उंड्डाणपुलावरून हरणांचा कळप खाली कोसळून त्यात एकाचवेळी १४ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूर-पुणे महामार्गावरील केगाव येथे विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा मुद्दा एरणीवर आला आहे.
या घटनेला वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केगाव-विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर देशमुख वस्तीनजीक उड्डाणपूल आहे. या भागात हरणांसह काळविट व इतर वन्य प्राण्यांच्या कळपांचा नेहमीच वावर असतो. आसपासचा बहुतांशी परिसर सपाट आणि तुलनेत कमी वर्दळीचा आहे. हरीण व काळविटांचे कळप राष्ट्रीय महामार्गावर येतात आणि रस्ता ओलांडून पुढे जातात. रस्त्यावरील वाहनांमुळे भीतीने पुढे पळत असताना अपघात होतात. उड्डाणपुलावरून पुढे पळताना काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली कोसळतो आणि त्यांचे जीव जातात. असे प्रकार नेहमीच घडतात, असे केगाव परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून वन विभागाचे पथक दाखल झाले आहे . जवळपास 12 हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले . काळवीटांचा कळप माळरानावर अन्न – पाण्याच्या शोधात फिरत होता . त्यावेळी काही भटकी कळपांच्या मागे लागल्याने काळवीट रस्ता मिळेल त्या दिशेने सुसाट धावत होती . देशमुख वस्ती परिसरात नवीन बायपास रस्ता लगतच्या सर्व्हिस रस्तानंतर अचानक 30 फुट खोल भुयारी मार्ग केलेला आहे . माळरानावरून सर्व्हिस रोडकडे पळत आलेल्या काळवीट पुढे रस्ता असेल असे समजून टाकलेली उडी 30 फूट भुयारी रस्त्यावर पडली.
उंचावरून डोक्यावर आदळल्याने काळविटाचा जागीच मृत्यू झाला. ‘या भागातून नेहमीच हरणं आणि इतर प्राणी रोड क्रॉस करत असतात . घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने हरणाच्या कळपाने पुलावरून उडी मारली असेल आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाला असेल’ असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
मार्च 28 मार्च 2022 रोजी या परिसराची दुर्घटना घडली होती . त्यावेळी रस्त्याचा अंदाज मारणे एका काळवीट मृत्यूमुखी पडले होते . यावेळी 14 काळवीट कळप रस्त्यावर पडला. या घटनेची माहिती कळताच उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनाधिकारी बाबा हाके, लक्ष्मण आवारे ,वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा घटनास्थळी दाखल झाले.
नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हरणांचा कळप पुलावरून खाली पडला आहे.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. जवळपास 14 हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
या भागातून नेहमीच हरणं आणि इतर प्राणी रोड क्रॉस करत असतात. घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने हरणाच्या कळपाने पुलावरून उडी मारली असेल आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज सोलापूर वन विभागाचे प्रमुख, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी वर्तवला आहे.