बोडरे कुटुंबियाला “आपुलकीची” भेट

उदरनिर्वाहासाठी प्रतिष्ठानने घेऊन दिली शेळी

Spread the love

सांगोला / नाना हालंगडे
ट्रॅक्टर अपघातात मरण पावलेल्या शिरभावी येथील रोहित बोडरे याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्यावतीने बोडरे कुटुंबियांस दिवाळीची भेट म्हणून एक शेळी घेवून देण्यात आली.

3 सप्टेंबर 2021 रोजी ट्रॅक्टर अपघातात शिरभावी येथील रोहित आक्रेशन बोडरे या युवकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांची भेट घेवून आपुलकी प्रतिष्ठानने आपुलकी दाखवत 6 महिन्यांचा किराणा माल व दरमहिना 2 हजार रुपये मदत देण्याचे ठरविले.

त्यानुसार किराणा माल पोहोच केला जात आहे. मात्र उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बऱ्यापैकी मार्गी लागावा म्हणून रोहित बोडरे याची आई मिनाताई बोडरे यांना शेळीपालनासाठी शेळी घेवून देण्याचा निर्णय आपुलकी प्रतिष्ठानच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी देणगी देवून सहकार्य केले.


जमा झालेल्या या देणगीतून मंगळवार (दि.26) रोजी त्यांना दोन पाटी असलेली शेळी घेवून देण्यात आली. गरीबाची म्हैस म्हणून शेळी ओळखली जाते. शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळू शकते व एका शेळीपासून शेळीपालनाची चांगली सुरवात होवू शकते म्हणून ही मदत करण्यात आली.

“शेळीची ही मदत माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खूप मोलाची आहे, आपुलकी प्रतिष्ठानने आपल्या कुटुंबाला मोठा आधार देवून दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी भावना यावेळी मिनाताई बोडरे यानी व्यक्त केली”.

शेळी व दोन पाटी सुपुर्त करताना आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, खजिनदार शरणप्पा हळ्ळीसागर, कार्यकारिणी सदस्य अरविंद केदार, हरीभाऊ जगताप यांचेसह शहाजी घाडगे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपुलकी प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी आहे. मी वारंवार याचे उपक्रम पाहत आहे. आपुलकी प्रतिष्ठान खऱ्या, गरीब व्यक्तीपर्यंत पोहचून त्यांना आपुलकीची माया देत आहे. त्यातील सर्वच व्यक्तीचे आभार मानण्यास शब्दही अपुरे पडतात. दीपावली फराळ वाटपाचा कार्यक्रमही स्तुत्य असाच आहे. त्यांना कार्याला माझा सलामच आहे. _ डॉ. बाबासाहेब देशमुख

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका