बाबा समजून घेताना

डॉ. घपेश पुंडलिकराव ढवळे : जागतिक पितृदिन विशेष

Spread the love

जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही.परंतु एक बापच असतो जे मुलाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला पाहून आनंदी होतात .आईप्रमाणे वडीलाचे महत्वही जीवनात खूप असते.आई-बाबा या दोन शब्दांमध्ये जणूकाही आपले विश्व सामावलेले असते. आई म्हणजे तिने आपल्याला जन्म दिला सुंदर जग दाखविले, व बाबा म्हणजे जे दिवस-रात्र कष्ट घेतात आपल्याला मोठे करण्यासाठी,आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी, असे म्हणतात की आई ही दिव्याची ज्योत असते तर त्याचा प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा दिवा म्हणजे बाप असतो. बाबा आपण लहाणा पासून मोठे होईपर्यंत आपण्यासाठी कष्ट घेतात. व आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात. आई बाबांचे प्रेम हे निस्वार्थ असते आपण कितीही मोठे झालो तरी त्यांच्यासाठी लहान असतो.आपण यशस्वी व्हावं हेच त्यांचे स्वप्न असते. तेच आपल्यावर संस्कार घडवितात व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन देत असतात.

लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते कुठे जाऊ नको, काही करू नको, बाबा मारेल! शाळेत जा नाहीतर बाबा मारेल , हे करू नको, बाबा मारेल, ते करू नको, बाबा मारेल, मुलही बाबांना घाबरतात. बाबांच्या भयाने मुलेही शाळेत जातात. बाबानी मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुले बाबांकडे दुर्लक्ष करत, आईवर प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना काढून टाकतात, आणि आईच्या चरणी सर्वस्व अर्पण करतात. बाबां पासून चार हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात, आई वरती कविता करतात , चारोळ्या करतात, कोणतीच मुलं बाबांना दुधावरची साय म्हणत नाही. लंगड्याचा पाय म्हणत नाही. वासराची गाय म्हणत नाही. बाबासाठी मुलाकडे हे शब्दच नसतात, ठेच लागली तरी, मुलं बापरे म्हणत नाही. साने गुरूजींना शामचा बाप दिसत नाही. आई घरात असली की घर कसे भरल्यासारखे वाटते, बाबा घरात असले की स्मशान शांतता. मुल शपथ सुद्धा आईचीच घेतात, बाबा शपथीच्याही लायकीचा नसतो. बाबा असते केवळ मुलांच्या नावाच्या आडनावा मध्ये नावापुरता, धरणीला, देशाला माता म्हणतात .पण बाप मात्र धरणीनीतुन देशातून हद्दपार असतो. बाबा असतो कठोर, काळीज नसलेला निर्दयी मारकुटा, बाप असतो मुलाच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा, बाप म्हणजे केवळ रुपये पैसे कमावणारा यंत्र ,तेवढे काम त्यांनी केले की त्यांचा कर्तव्य तेवढ संपल.

पण असं असूनही बाबा गेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते, का उसळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस, का वाटतो मुलांना पायाखालची जमीन सरकली, का वाटतो की मुलांना आपण बेसहारा झालोय- म्हणून, का मुल हंबरतात बाबा गेल्यावर, का मुल घाबरतात बाबा गेल्यावर , कथा-कादंबरी कधीही नसलेला हा पत्थर दिल बाप प्रत्यक्षात जीवंत नसतो.तेव्हा का वाटतो मुलांना ‘डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात . ‘डोळे उघडे करून ची प्रेम करतो तिला मैत्री म्हणतात. ‘डोळे वटारुन प्रेम करते तिला पत्नी म्हणतात . आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात.

अंगामध्ये रक्त सैरावैरा धावते तेच रक्त कदाचित बापाला बाप म्हणायला लावते ,बाबा मारत नाही कधीतरी आपण घाबरायचं पण बाबांची करंगळी घेऊन चालायचं ,स्वप्नांतला सुलतान बाबा सारखा वाटायचं, तरी पन सगळया गरजा, हट्ट डोळ्यासमोर थाटायचा तो बापच.

आता तुझ्या चपला मला होतात ,उंची तुझ्यापेक्षा जास्त झाली आहे. पण तुझ्या डोळ्यात बघायची हिम्मत अजून आली नाही. धावताना अडकतो तेव्हा तुला सोडून कोणालाच पकडायची हिम्मत होत नाही, कधी बोललो नाही पण तुझी जागा बाबा कधी कुणालाच घेता येत नाही.

 – डॉ. घपेश पुंडलिकराव ढवळे
नागपुर, 860004456
ghapesh84@gmail.com

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका