आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी
बलवडीतील होलार समाज तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील बलवडीतील होलार समाज तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर आयोजित करून स्तुत्य उपक्रम राबविला.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजीराव ढोबळे उपस्थित होते.
सरपंच नारायण करडे, पोलीस पाटील श्रीमंत तोरणे, तात्यासाहेब शिंदे, धनंजय धबधबे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन धनंजय धबधबे यांनी केले. या कार्यक्रमासाठी बलवडी व परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. अत्यंत उत्साही वातावरणात हा कार्यक्रम झाला.