फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस पुरस्कार जाहीर
सहकार मंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथे होणार गौरव
फलटण (विकास बेलदार): आदर्श बाजार समिती म्हणून फलटण पॅटर्न म्हणून नावलौकिक वाढविल्याबद्दल फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा उद्या नवभारत टाइम्स वतीने आयोजित सहकार परिषदेमध्ये वाय. बी. सेंटर मुंबई येथे ना. बाळासाहेब पाटील (सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येत आहे.
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समिती फलटण व श्री.भगवान दादासाहेब होळकर, व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ, श्री.शंकरराव सर्जेराव सोनवलकर, सचिव व स्टाफ यांनी शेतकरी केंद्रबिंदू म्हणून कार्य करीत असताना, शेतकऱ्याच्या शेतीमालाला अधिकचा दर देणेसोबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीविषयक व जीवनविषयक प्रश्नांची सोडवणूक केली.
कोविड काळात शेतकऱ्याच्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीची व्यवस्था एकही दिवस खंड पडू न देता पुरवठा साखळी सुरु ठेवून, सुसज्य असे कोविड सेंटर उभारून एक वेगळा आदर्श फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने निर्माण केला आहे. मार्केट यार्ड येथे शेतमालाची आवक वाढविण्यासाठी शेतकरी हितास्तव तसेच हमाल, मापाडी यांचे करिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केले. शेतकरी व वेटर्नरी हॉस्पिटलच्या महत्वकांक्षी प्रकल्पाची उभारणी करत, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून अलीकडच्या काळात फलटण तालुक्यात अवतरलेल्या दुसऱ्या हरित क्रांतीमुळे उत्पादित होत असलेल्या शेतीमालासाठी अधिक सक्षम अशी पणन व्यवस्था दिली.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक स्पर्धाक्षम व लोकाभिमुख केल्याबद्दल व एक आदर्श बाजार समिती म्हणून फलटण पॅटर्न म्हणून नावलौकिक वाढविल्याबद्दल फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा उद्या नवभारत टाइम्स वतीने आयोजित सहकार परिषदेमध्ये वाय बी सेंटर मुंबई येथे मा.ना.श्री.बाळासाहेब पाटील (सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येत आहे.