फड सांभाळ तुऱ्याला गं आला
सांगोला तालुक्यात 3 हजार हेक्टर ऊसावर तुरा
गेली तीन-चार वर्षापासून अतिवृष्टी, शेती योजनांचे आलेले पाणी यामुळे तालुका गारेगार झाला आहे. तर याचा विपरीत परिणाम फळबागावर झाला. त्यामुळे शेतकरी वर्ग आपोआप ऊस पिकाकडे वळलेला आहे.
सांगोला/ नाना हालंगडे
फड सांभाळ तुऱ्याला गं आला
तुझ्या ऊसाला, लागंल कोल्हा
अशी अवस्था सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. तोडणी अभावी ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले असून 4 हजार क्षेत्र असलेल्या या तालुक्यात साडे तीन हजाराहून अधिक क्षेत्राला यांनी व्यापले आहे.
कधी नव्हे ते उसाचे क्षेत्र वाढले अन् तुऱ्याने उसबागायातदार हैराण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील, माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुका अशी काहीशी पूर्वापार ओळख. पण सध्या तरी ही पुसली गेली आहे. कारण गेली तीन-चार वर्षापासून अतिवृष्टी, शेती योजनांचे आलेले पाणी यामुळे तालुका गारेगार झाला आहे. तर याचा विपरीत परिणाम फळबागावर झाला. त्यामुळे शेतकरी वर्ग आपोआप ऊस पिकाकडे वळलेला आहे.
सध्या सांगोला तालुक्यात 4 हजार हेक्टरवर हे उसाचे क्षेत्र आहे. को 86032, फुले 265 व्हीएसआय 8005 या जातीचा समावेश आहे. दोन ते तीन वर्षापासून पडणाऱ्या सततच्या पाऊसामुळे तालुक्यातील शेतजमिनी ह्या ओस पडू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवण्याऐवजी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण केली. विना झंझट आणि कमी श्रमाने अधिक लोकांचा ओडा याकडे वळला आहे. पण सध्या तालुक्यातील ऊसाला तोड मिळत नसल्याने अनेकांचे ऊस राणातच तुरे येवून डोलू लागले आहेत.
उसाचे वजनही घटू लागले
असे हे ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्यामुळे उसाचे वजनही घटत आहे. सांगोला तालुक्यात या वर्षीच साखर कारखाना सुरू झाला आहे. पण अनेकांच्या उसाच्या नोंदी यांच्याकडे नाहीत. त्यामुळे तालुक्यातील 3 हजार हेक्तरच्या आसपास उसाचे क्षेत्र रानातच पडून आहे. अनेकजण मंगळवेढा, जत आधी ठिकाणी आपला ऊस पाठवीत आहेत. या चार हजार हेक्टर क्षेत्रापैकी 50 टक्के लोकांनी तर ठिबक सिंचनाद्वारे ऊस शेती केली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे ऊसाचे क्षेत्र वाढू लागले आहे. अनेकांनी ऊस शेतीलाच पसंती ही दिलेली आहे. त्यामुळे नव्याने लागण करण्यासही अनेकजण धडपडत आहेत.
येत्या 5 वर्षात संपूर्ण तालुकाभरात हेच ऊसाचे क्षेत्र 50 हजाराहून अधिक हेक्टरवर जाणार असल्याचे, जाणकार मंडळी सांगत आहेत. आत्ता ऊसाला लवकर तोड मिळत नसल्याने, ऊसबागायतदार शेतकरी डोक्याला हात लावून बसलेला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सांगोला तालुक्यात सध्यस्थितीला 4 हजार हेक्टरवर ऊसाचे क्षेत्र आहे. यामध्ये को 86032, नीरा 8600, फुले265 व व्हींएसआय 8005 या जातींचा समावेश आहे. पण सध्या या ऊसाला तोडी आल्या नसल्याने हा तुऱ्याने डोलू लागला आहे. सांगोला तालुक्यात एकच साखर कारखाना आहे,त्यांच्याकडे या उसाच्या नोंदीही नाहीत त्यामुळे हा ऊस रानात असाच राहत आहे.
ऊसशेती फायदेशीर
माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुका अशी ओळख असली तरी, गेली 2 ते 3 वर्षापासून तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यातच टेंभू, म्हैसाळ,नीरा उजवा कालवा व अन्य योजनांचे पाणी आल्यामुळे तालुका पाणीदार झाला आहे. तर फळबागावर मोठ्या प्रमाणात रोगराई पडीत असल्याने शेतकरी आत्ता ऊस शेतीकडे वळले आहेत.
तुऱ्यामुळे वजनात घट
तालुक्यात ऊसाची लागण शेतकऱ्यांनी मागील 9 ते 10 महिन्यापूर्वी केलेली आहे. अनेकांचे हे क्षेत्र 2 ते 5 एकरापर्यंत आहे. पण या ऊसाला तोडी येत नसल्याने सध्या हे तुऱ्यात आले आहे. यामुळे वजनात मोठी घट होत आहे. तर कोणी पशुपालकही हे ऊस जनावरांसाठी नेत नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. केवळ वेळेत तोडणी होत नसल्याने, हे वजनात घट होत आहे.