ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी
Trending

“प्रेयसीला नव्हे, गाईला मिठी मारून साजरा करा व्हॅलेन्टाईन डे”

पशुसंवर्धन मंत्रालयाचा आदेश, नेटकऱ्यांनी धू धू धुतले

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
गो भक्तीत आंधळे झालेले भक्त कोणता निर्णय घेतील याचा नेम नाही. असाच एक फतवा भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुसंवर्धन मंत्रालय अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा विभाग यांनी काढला आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेन्टाईन डे दिवशी “गाय मिठी दिन ” साजरा करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (Issued by the Department of Animal Husbandry and Dairying under the Ministry of Fisheries, Animal Husbandry, Government of India. Instructions have been given to celebrate “Cow Mithi Day” on February 14 on Valentine’s Day.)

जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपले जीवन टिकवते, पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या मातेसारख्या पौष्टिक स्वभावामुळे ती “कामधेनू” आणि “गौमाता” म्हणून ओळखली जाते. कालांतराने पश्चिम संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला गेला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईचे आलिंगन दिवस म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण करावे.” All cow lovers should celebrate 14th February as Cow Hug Day keeping in mind the importance of cow and make life full of happy and positive energy.

सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या निर्देशानुसार हे पत्र जारी करण्यात येत आहे. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय येथील अधिकारी एस.के. दत्ता यांच्या सहिने हे पत्र काढण्यात आले आहे. Officials from the Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying S.K. This letter has been drawn with the signature of Dutta.

नेटकऱ्यांनी धू धू धुतले
केंद्रीय मंत्रालयाच्या पातळीवरून निघालेले हे पत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावर साधक बाधक चर्चा झाली. मात्र नेटकऱ्यांनी सरकारच्या या धोरणाला विरोध करीत धू धू धुतले आहे.

या विषयावर भाष्य करताना दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे लिहितात की, “गाईला मिठी मारण्याची कल्पना आपल्याला एकदम आवडलीय.
दोन सूचना आहेत.
एक म्हणजे, दिसेल त्याला मिठी मारणा-या आदरणीयांनी या अभियानाचे उद्घाटन करावे.
दोनः गाय गरीब असेल तर ठीकय, पण मारकी निघाली, तर काय?
त्यासाठी सरकारने व्हॅलेंटाइन विमा पॉलिसी जाहीर करावी. एवढेच. बाकी, या नव्या अमृत देशात प्रेम कधीच वारले आहे.”

सुप्रसिध्द नाटककार गणेश दिघे यांनी मार्मिक व्यंगचित्र आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट केले आहे.

मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद आंबेकर यांनी लिहिले आहे की, “गाईला मिठी मारण्याच्या संकल्पनेला विरोध करता कामा नये. हौसेमौजेचे दिवस आहेत. सत्ता असतााना नाही करणार तर कधी करणार?”

सुप्रसिध्द लेखक श्रीरंजन आवटे लिहितात की, ”गायी पाण्यावर काय म्हणूनि आल्या?
कवी बी यांच्या कवितेतील प्रश्नाचं उत्तर अखेरीस मिळालं: व्हॅलेंटाईन डे साजरा करायला !”

महेश लंकेश्वर यांनी कवितेतून जोडे लगावले आहेत. “प्रचंड बहुमतात असूनही गायीला मिठ्या मारायला लावणारे , व्हॅलेंटाइन डे अजूनच आंडळतात, असल्या भयानक निराश येडझव्यामुळं तर या देशात SBI चं सर्व्हर कायम डाऊन असतंय…”

एक लेखक लिहितो की, “अध्यक्ष महोदय ,
गायघाल्यानी बिच्चा-या गायीला मिठी मारणं म्हणजे गायीचा विनयभंग आहे!!!”

प्रसिद्ध पत्रकार मंदार फणसे लिहितात की, आणि बैल दुःखी झाला..
पुअर गाय हगिंग अ गाय..

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी लिहितात की, ”गाय-मिठी दिवस साजरा करा असा केंद्राचा आदेश आला आहे.
शेतकरी गाईला, बैलाला मिठी मारत नाही, प्रेमानं त्यांच्या अंगावरून हात मात्र फिरवतो. त्यामुळे ग्रामीण भारत या मूर्खपणावर नक्कीच हसत असेल.

शेती, गाई, पीकं यांच्याशी कधीही कोणताही संबंध न आलेले बैल राज्यावर आणले की असंच होणार.”

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय येथील अधिकारी एस.के. दत्ता यांच्या सहिने हे पत्र काढण्यात आले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका