प्रा. प्रमोद मागाडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.

जवळा ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी

Spread the love

जवळा (विशेष प्रतिनिधी)
सांगोला तालुक्यातील जवळा येथील सुपूत्र व सध्या झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँँड रिसर्च येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. प्रमोद बुद्धानंद मागाडे यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. जाहीर केली आहे.
”Design and Development of Novel Mini Wind Power Turbine Set to Harvest Wind Energy Developed By Road Vehicles on Highway” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. याकरिता त्यांना डॉ. एस.पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मिळवले यश
प्रमोद बुद्धानंद मागाडे यांचे बालपण काहीकाळ जवळा येथे गेले. त्यांचे वडील नोकरीच्या निमित्त वारणानगर (जि.कोल्हापूर) येथे स्थायिक झाल्यावर प्रमोद मागाडे यांनी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँँड टेक्नोलॉजी येथे बी.ई. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचं एम.टेक. शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे झाले. सध्या ते झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँँड रिसर्च येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे एकूण ९ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे. यासाठी त्यांना त्यांचे वडील बुद्धानंद मागाडे, भाऊ डॉ. सुशीलकुमार मागाडे, आई तसेच पत्नी यांची साथ मिळाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करीत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यापूर्वीच त्यांचे लहान बंधू प्रा. सुशीलकुमार मागाडे यांनीही VNIT नागपूर येथून पीएच.डी. पदवी संपादित केली आहे.
प्रा. प्रमोद मागाडे यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल जवळा ग्रामस्त, मागाडे बांधव, पुणे, कोल्हापूर तसेच सांगली येथील त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.

मागाडे परिवारातील चौघे झाले ‘डॉक्टर’
जवळा येथील मागाडे परिवारातील आजपर्यंत चौघेजण ‘डॉक्टर’ बनले आहेत. डॉ. बाळकृष्ण सोनाप्पा मागाडे, डॉ. बाळासाहेब दत्तात्रय मागाडे, डॉ. सुशीलकुमार बुद्धानंद मागाडे व डॉ. प्रमोद बुद्धानंद मागाडे हे चौघेजण डॉक्टर बनले आहेत. हे चौघेही विविध ठिकाणी अध्यापन करीत आहेत. डॉ. प्रमोद बुद्धानंद मागाडे यांच्या यशाबद्दल थिंक टँँक डिजिटल मीडियातर्फे हार्दिक अभिनंदन.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका