प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर उत्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मानित

संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

Spread the love

 

सोलापूर/अशोक कांबळे : संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ.तब्बसुम मुजावर यांना नवव्या आंतरराष्ट्रीय संशोधक परिषदेत उत्कृष्ट संशोधक पुरस्काने सन्मानित करण्यात आले.


तामिळनाडूतील ट्रिची येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेत अनेक देशातील संशोधक सहभागी झाले होते.
प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांनी सोलापूर विद्यापीठातून 2016 साली पीएचडी संपादन केली असून इलेक्ट्रॉनिक विषयातून सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.त्यांनी बावीस पेक्षा जास्त राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संशोधक परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे.तामिळनाडूमध्ये 2013 साली व सोलापूर विद्यापीठामध्ये भूशास्त्र संकुलामध्ये 2017 साली भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांच्या शोधनिबंधाला बेस्ट पेपर आवार्डने सन्मानित करण्यात आले होते.प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांचे 40 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर प्रकाशित असून 21 राष्ट्रीय संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत.2018 सालामधील लंडन येथील नोबल पुरस्कार विजेते गरार्ड मोराऊ यांनी संपादित केलेल्या पुस्तकामधे प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांची दोन प्रकरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.त्यांची जर्मनी येथे दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांनी अनेक सेट नेट कार्यशाळाना मार्गदर्शन केले असून कमी वयात तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे.कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात त्या रँकर होत्या.तेथेच त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले होते.प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील पदव्युत्तर परिक्षेत प्रथम क्रमांक आल्यामुळे मेरिट स्कॉलरशीप व स्वर्गीय शांताराम नारायण वैंगणकर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांना संशोधनासाठी प्रा.डॉ.एल.पी.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असून ग्रामीण भागातील मुलीने आंतरराष्ट्रीय संशोधक परिषदेत प्रतिष्ठेचा उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फङणवीस,फिझीक्स विभागाचे संचालक प्रा.डॉ.विकास पाटील,विद्यापीठातील विविध विभागाचे प्राध्यापक आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

किचन आणि मोठ्या इंडस्ट्रीज मधील एलपीजी संबधी लिकेज टाळण्यासाठी मॉडेल तयार करण्यात आले आहे.ते मॉडेल म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट फॉर इंजिनियरींग अँन्ड टेक्नॉलॉजी असून त्यासंबंधी तामिळनाडू येथील आंतरराष्ट्रीय संशोधक परिषदेत पुरस्कार देण्यात आला आहे.या परिषदेत फ्रान्स,अमेरिका,जर्मनी,रशिया,आदि देशातील संशोधक सहभागी झाले होते.पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर,सहाय्यक प्राध्यापिका,पदार्थ विज्ञान विभाग,सोलापूर विद्यापीठ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका