प्रलंबित पुरवणी देयकासाठी 7.90 कोटी रकमेची तरतूद
शिक्षक समितीचा पाठपुरावा यशस्वी
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 7.89 कोटीची तरतूद मंजूर झाल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी यांनी दिली.
सांगोला/ नाना हालंगडे
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित पुरवणी देयके, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले, सेवानिवृत्त व मयत शिक्षकांच्या 7 वा वेतन आयोगातील फरकाचे 2 हफ्ते,थकीत व इतर पुरवणी देयके निधीअभावी मागील वर्षभरापासून प्रलंबित होती.सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 7.89 कोटीची तरतूद मंजूर झाल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी यांनी दिली.
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे , राजेंद्र नवले, दयानंद कवडे, सुरेश पवार , भारत कुलकर्णी , राजन सावंत , संतोष हुमनाबादकर, चंद्रहास चोरमले, रमेश खारे , रंगनाथ काकडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार,उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी डाॕ.किरण लोहार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले असून हा निधी तालुकास्तरावर वितरित होणार असल्याचे बसवराज गुरव , राजन ढवण, दयानंद चव्हाण यांनी सांगितले.
वैद्यकीय देयक व इतर पुरवणी देयकासाठी जवळपास 7,89,23,902 एवढी रक्कम जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग होणार असून संबंधित शिक्षकांना पंचायत समितीने स्तरावरुन अदा केली जाणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षक बांधवांची वैद्यकीय बिले अजूनही मोठया प्रमाणात आरोग्य विभागातील मंजूरीच्या प्रतिक्षाधीन असून याबाबतीत देखील सातत्याने पाठपुरावा सुरु असून सांगोला तालुक्यासाठी 28लाख एवढया रकमेची उपलब्धता झाल्याचे अध्यक्ष भारत लवटे , सरचिटणीस भागवत भाटेकर यांनी सांगितले.