प्रखर आंदोलक, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांना राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार जाहीर
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसकडून गौरव, शुक्रवारी नातेपुते येथे कार्यक्रम
आंदोलन म्हणजे बापूसाहेब आणि बापूसाहेब म्हणजे आंदोलन हे समीकरण सांगोला तालुक्याने मागील अनेक वर्षांपासून अनुभवले आहे. विविध सामाजिक विषयावर, अन्यायाबाबत बापूसाहेब ठोकळे हे ताकदीने आंदोलन करीत असतात. चोवीस तास समाजसेवेचा वसा घेऊन त्यांचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील झुंजार बहुजन नेते, प्रखर आंदोलक बापूसाहेब ठोकळे यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) या सामाजिक संघटनेचा राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी नातेपुते येथे भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) या सामाजिक संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष समाधान धांडोरे यांनी दिली.
आंदोलन म्हणजे बापूसाहेब
आंदोलन म्हणजे बापूसाहेब आणि बापूसाहेब म्हणजे आंदोलन हे समीकरण सांगोला तालुक्याने मागील अनेक वर्षांपासून अनुभवले आहे. विविध सामाजिक विषयावर, अन्यायाबाबत बापूसाहेब ठोकळे हे ताकदीने आंदोलन करीत असतात. चोवीस तास समाजसेवेचा वसा घेऊन त्यांचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
विद्यार्थीदशेपासून समाजकारणात
बापूसाहेब ठोकळे हे विद्यार्थीदशेपासून समाजकारणात काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विद्यार्थीदशेपासून त्यांनी सामाजिक अन्याय, विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप प्रश्नावर त्यांनी केलेली आक्रमक आंदोलने आजही लोकांच्या आठवणीत आहेत.
संघटक बापूसाहेब
बापूसाहेब ठोकळे हे उत्तम संघटक आहेत. त्यांचा स्वभाव हा माणसे जोडण्याचा असल्याने उत्तम संघटक म्हणून ते सर्वांना ज्ञात आहेत. यामुळेच सांगोला तालुक्यासह राज्यात त्यांचा हजारोंचा चाहता वर्ग आहे.
रिपब्लिकन नेते
बापूसाहेब ठोकळे यांनी रिपब्लिकन चळवळीतही दमदार काम केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्षे विविध पदांवर काम केले आहे. मात्र कोणत्याही पदाचा हव्यास न बाळगता त्यांनी सतत पुरोगामी, आंबेडकरी विचारधारा जोपासत पुढे जाण्याचा मार्ग पत्करला आहे.
समविचारी संघटनांचे आधारवड
बापूसाहेब ठोकळे यांनी आंबेडकरी चळवळीत काम करीत असतानाच समविचारी संघटनांना सोबत घेऊन विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविला. दलित, मुस्लिम, भटका समाज तसेच विविध वंचित घटकांना एकत्र करून एक संवाद सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले.
बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक
बापूसाहेब ठोकळे यांनी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक म्हणून खूप मोठी जबाबदारी निभावली आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. ते सध्याही बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक म्हणून कार्यरत आहेत.
गोरगरिबांना आधार
सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वंचित, पीडित लोकांना संकटाच्या, अडचणीच्या काळात धीर देवून त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यामुळेच ते गोरगरिबांचे आधारवड बनले आहेत.
उत्तम वक्ते
बापूसाहेब ठोकळे हे उत्तम वक्ते आहेत. भारतीय संविधान, आंबेडकरी चळवळ, बहुजनवादी महापुरुष, स्त्रियांचे, भटक्यांचे प्रश्न यावर त्यांचा अभ्यास आहे. परखड आणि अभ्यासू वक्ते म्हणून ते या भागात परिचित आहेत.
एकनिष्ठ भीमसैनिक
तडजोडीच्या राजकारणात एकनिष्ठा हरवत चालली आहे. बापूसाहेब ठोकळे हे आंबेडकरी विचारधारेशी एकनिष्ठ आहेत. कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता त्यांनी आपली आंबेडकरी विचारधारेशी निष्ठा जोपासली आहे.
कोरोना काळात मदतीचे काम
बापूसाहेब ठोकळे यांनी कोरोना काळात तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जात आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, पिरॅमल स्वास्थ्य, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन मशिनी भेट दिल्या.
उत्तुंग कार्याची योग्य दखल
बापूसाहेब ठोकळे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची योग्य दखल घेत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसकडून राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार देवून गौरव करण्यात येत आहे. शुक्रवारी नातेपुते येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.