पुनर्वसन विभागाच्या भ्रष्टाचाराचा प्रश्न विधानपरिषदेत मांडणार : आ. गोपीचंद पडळकर

सोलापूर पुनर्वसन भ्रष्टाचारासंदर्भात आरपीआयचे शिष्टमंडळ आमदार पडळकर यांच्या भेटीलाl

Spread the love

पंढरपूर / एच . नाना

सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्याच्या विधान परिषदेत मांडणार असल्याचे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरपीआयच्या शिष्टमंडळास दिले आहे.
सोलापूर पुनर्वसन विभागाच्या भ्रष्टाचार व मनमानी कारभाराविरोधात कारवाई करण्याबाबतची तक्रार आरपीआयचे युवक प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. याबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आरपीआयचे शिष्टमंडळ भेटीले होते.


याप्रसंगी आरपीआय (आठवले) प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे, भाजपचे सुभाष मस्के, माऊली हळवणकर, दत्ता वाघमारे, महादेव सोनवणे, सुभाष वाघमारे, बालाजी वाघमारे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर पुनर्वसन विभागात प्रकल्प ग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात  साखळी तयार झाली आहे. दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकरणांमुळे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सातारा,पुणे व इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर,मंगळवेढा माळशिरस,माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचा शोध घेऊन सदर व्यवहारात मिलीभगत करून कमी किमतीत जमिनीची खरेदी करून दाम दुप्पट दराने जमीन विक्री केली जात आहे. यामुळे सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना जादा आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे काही पुनर्वसन खरेदी,विक्री व्यवहार ही रद्द झाले असल्याचे आदेशही निघाले आहेत. काही प्रकल्पग्रस्तांचे एकाच आदेशावर दोन दोन ठिकाणी जमिनी खरेदी करून झालेल्या आहेत तर काही जमिनी खरेदी विक्रीच्या प्रकरणांचे कोर्ट केस असताना विक्री झालेल्या आहेत तरी काही खरेदी-विक्री केलेल्या जमिनीत शासकीय अनुदानाचा लाखो रुपयांचा लाभही घेतला. आशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांना आरपीआयचे शिष्टमंडळ भेटले असता.सदर गंभीर प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार पडळकर यांनी दिले असल्याची माहिती आरपीआयचे दीपक चंदनशिवे यांनी दिली आहे.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका