पुढील दोन महिन्यात जगावर भीषण संकट! बाबा वेंगा यांचे धडकी भरवणारे भाकीत | Think Tank Live
थिंक टँक / नाना हालंगडे
बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. बाबा वेंगा यांचे आतापर्यंत २ अंदाज खरे ठरले आहेत. आता नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये बाबा वेंगा यांनी ५ भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या खऱ्या झाल्यास जगात उलथापालथ होऊ शकते. (Baba Vanga Prediction) सौर वादळ, त्सुनामी, अणुबॉम्ब हल्ला आदी भाकिते त्यांनी वर्तवून ठेवली आहेत.
जगात काय होणार?
बाबा वेंगा यांच्या मते २०२३ वर्ष हे केवळ अमुक एका देशासाठीच नव्हे तर पृथ्वीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. २०२३ साली पृथ्वी व अन्य ग्रहांच्या हालचाली या वारंवार व वेगाने झाल्याने मानवी आयुष्यात मोठे बदल दिसून येऊ शकतात. पृथ्वीची कक्षा बदलून नैसर्गिक आपत्तीची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केली आहे. तसेच यंदा मानवनिर्मितही काही संकटांची चाहूल लागल्याचे बाबा वेंगा यांनी सांगितले आहे.
- बाबा वेंगा कोण आहेत?
बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात. तीच विश्वासार्ह समजली जाते. - बल्गेरियातील संदेष्टा बाबा वेंगा हे एक गूढवादी होते आणि आंधळे होते ज्यांच्या अनेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आहेत. 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी दृष्टी गेली. त्यांचे 85 टक्के अंदाज खरे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट १९९६ मध्ये बाबा वेंगा यांचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले. पण मृत्यूपूर्वीच त्यांनी ५०७९ पर्यंत भाकित केले होते.
- मागील परिस्थिती पाहता अनेकवेळा बाबा वेंगा यांच्या भाकिताप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली होती. २०२३ मध्ये वेंगा यांची भविष्यवाणी खरी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- बल्गेरियाचे संदेष्टे बाबा वेंगा हे जगातील प्रसिद्ध भविष्यसूचक वक्ते आहेत. बाबा वेंगा यांनी २०२२ या वर्षासाठी अनेक भीतीदायक भविष्यवाणी केली होती. भाकितांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगाच्या अनेक भविष्यवाण्या आता खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वांगे यांना बाल्कन प्रदेशातील नॉस्ट्राडेमस म्हणतात.
बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
येणाऱ्या नव्या वर्षात कोणती संकटे?
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, एक मोठा देश २०२३ मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांचे संदर्भ पाहिल्यास रशिया-युक्रेन वाद खूपच चिघळला होता, जर भविष्यात यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अणुबॉम्ब वापरण्याचे संकेत दिले होते, यानुसार बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरू शकते.
बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
आजपर्यंत काय घडले?
बाबा वेंगा यांनी सन ५०७९ पर्यंत भाकीत केले होते. बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी केलेले दोन अंदाज आतापर्यंत खरे ठरले आहेत. सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेचा ९/११चा हल्ला यासह बाबा वांगे यांनी केलेले अनेक भाकीत खरे ठरले आहेत. बल्गेरियातील अंध बाबा वायेन्गा यांच्या भविष्यवाणीवर संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आता बाबा वेंगाचे भारताबाबतचे भाकीत लोकांना घाबरवत आहे. चला जाणून घेऊया बाबा वेंगा यांनी भारताबद्दल काय भाकीत केले आहे?
बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की 2022 मध्ये जगातील तापमान कमी होईल, ज्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल. अन्नाच्या शोधात टोळ भारतावर हल्ला करतील. टोळांच्या हल्ल्यात पिकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन देशात उपासमार होण्याची शक्यता आहे. बाबा वेंगाचे हे भाकीत खरे ठरले तर देशात मोठे संकट येऊ शकते. याआधी बाबा वेंगाची अनेक भाकिते खरी ठरली आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे सावट आहे.
कोणते दोन अंदाज खरे ठरले?
बाबा वेंगा यांनी २०२२ या वर्षासाठी अनेक भीतीदायक भविष्यवाणी केली होती. यापैकी काही देशांमध्ये पाण्याअभावी समस्या निर्माण झाल्याची चर्चा होती. पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांनी लोकांना कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे. या देशांमध्ये 1950 पासून सर्वात कमी पाऊस पडत आहे. 1950 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळाचा सामनाही इटलीला करावा लागत आहे.
बाबा वेंगा म्हणाले होते की, यावर्षी आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पूर येईल. याशिवाय भूकंप आणि त्सुनामीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या वर्षी ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झाला होता. बांगलादेश, भारताचा ईशान्येकडील प्रदेश आणि थायलंडमधील लोकांनाही पुराचा फटका बसला आहे. यावरून बाबा वेंगाचे हे भाकीतही खरे ठरल्याचे दिसते.
(सदरची बातमी तथ्ये आणि माध्यम चर्चेवर आधारित असून त्यातून कोणतीही अंधश्रद्धा अथवा भीती पसरवण्याचा हेतू नाही.- संपादक)
हेही पाहा आणि सबस्क्राईब करा
काय सांगता? गुवाहाटीला पुन्हा जाणार शिंदे गटाचे सर्व 50 आमदार!