पर्यावरणप्रेमी, लोककल्याणकारी शासक सम्राट अशोक

डॉ. घपेश ढवळे (नागपूर) यांचा विशेष लेख

Spread the love

भारताच्या इतिहासात सम्राट अशोक यांच्याएवढा लोककल्याणकारी राजा झाला नाही. हे एेतिहासिक सत्य आहे. सम्राट अशोकाने वने, वन्यजीव आणि पर्यावरणासाठीही शाश्वत कार्य केलंय. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घातली. पाळीव प्राण्यांना क्रूरपणे वागणूक देऊ नये याची कायदेशीर तजविज केली. सम्राट अशोक यांनी देशातील औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यासोबतच नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ वनस्पती परदेशातून मागवून त्या वाढविल्या. रस्ताच्या कडेला वृक्षारोपन केल्याने हे मार्ग वृक्षाच्छादित झाले. त्यांनी पाटलीपुत्र शहरात जगातील पहिले पशुचिकित्सालय उभारले होते. सम्राट अशोकांचे हे कार्य प्रेरणादायी असेच आहे. त्याच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख.

सम्राट अशोक हा एकमेव मूळ राजा होता ज्याने आजच्या नेपाळसह संपूर्ण भारत बनविला. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या देशांना एका झेंड्याखाली आणले होते. आपल्या मुलांसारखे त्यांना सुशासन दिले. त्यांच्या स्मरणार्थ आजही अशोकस्तंभ हे देशातील सर्वोत्कृष्ट प्रतीकांपैकी एक आहे. जगाच्या इतिहासात, त्याच्या नावाने महान गोष्टी करून त्याला संबोधित केले जाते. बुद्ध धम्माचे प्रचारक व त्यांच्या कुशल कारभारासाठी सम्राट म्हणून त्यांना ओळखले जाते.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा मार्ग अनुसरला. त्यांनी नेपाळमधील त्यांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनी येथील मायादेवी मंदिराजवळ तथागत बुद्धांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक स्तंभ उभारला.. बौद्ध धम्माचा प्रचार भारतव्यतिरिक्त श्रीलंका, अफगाणिस्तान, पश्चिम आशियामध्येही केला.

चक्रवर्ती सम्राट अशोक हे जगातील प्रसिद्ध शक्तिशाली भारतीय मौर्य घराण्याचे महान सम्राट होते. त्यांचे राज्य प्राचीन भारतात 279ते 232 पर्यंत होते. मौर्य राजवंश चक्रवर्ती सम्राट अशोकाने अखंड भारतावर राज्य केले. त्यांचे मौर्य साम्राज्य उत्तरेकडील हिंदुकुशपासून दक्षिणेकडील मैसूर आणि पूर्वेस अफगाणिस्तान ते इराणपर्यंत होते. संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार अशोकाचे साम्राज्य होते आणि बहुतेक लँडस्लॉक केलेले विशाल साम्राज्य आजपर्यंतचे सर्वात मोठे भारतीय साम्राज्य आहे. सम्राट अशोक हे प्रेम, सहिष्णुता, अहिंसा आणि शाकाहारी जीवनशैली जगले. भगवान बुद्धांच्या मानवतावादी शिकवणीचा प्रभाव पडल्यानंतर ते बौद्ध झाला.


वैशाली (बिहार) येथील अशोकस्तंभ
सम्राट अशोक : (इ.स.पू. ?३०३—?२३२). सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्य याचा नातू आणि बिंदुसार याचा मुलगा. बिंदुसार इ.स.पूर्व २७३ साली निवर्तला. त्यानंतर मगधाच्या गादीबद्दल वाद निर्माण झाले. त्यावर मात करून अशोकाने मगध राज्याचा ताबा मिळवल्यानंतर इ.स.पू. २६९ साली त्याचा राज्याभिषेक झाला. सम्राट अशोक हे अत्यंत शूर होते. आपल्या राज्याचा विस्तार त्याने दक्षिणेत म्हैसूरपर्यंत केला आणि दक्षिणेकडील चोल, पांड्य, सत्यपुत्र आणि चेर (केरळपुत्र) या राज्यांना आपले मांडलिकत्व पत्करावयास भाग पाडले. तसेच उत्तरेकडील काश्मीर राज्य त्याने आपल्या आधिपत्याखाली आणले. आंध्र आणि बंगाल या दोन्ही प्रदेशांच्या मध्ये असलेले कलिंग राज्य अशोकाने प्रखर लढाईअंती जिंकून घेतले. त्या युद्धात दोन्ही बाजूंच्या सैन्यदलांची प्रचंड हानी झाली.

अशोकाने आपल्या साम्राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेल्या शिलालेखांपैकी १३व्या शिलालेखात या युद्धाचा उल्लेख आहे. ‘कलिंग देशाबरोबरील युद्धात एक लाख सैनिक मारले गेले, दीड लाख बेपत्ता झाले आणि त्याहून जास्त जखमी झाले’, असे त्या शिलालेखावर नमूद करण्यात आले आहे. युद्ध संपल्यावर पसरलेल्या रोगराईत अनेक प्रजाजन मृत्यू पावले. या सगळ्यामुळे अशोक शोकग्रस्त झाला आणि त्याच्या मनात ऐहिक सुखांबाबत अतीव विरक्ती निर्माण झाली. त्यापश्चात त्याने सत्य आणि अहिंसावादी बौद्ध धर्म स्वीकारला.

त्यांनी  काही विद्यापीठांची स्थापना केली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला, कंधार अशा विद्यापीठांचा समावेश आहे. त्याकाळी बरेच परदेशी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी भारतात येत असत.

सम्राट अशोकाने बांधलेल्या मध्य प्रदेशातील सांची स्तूप, कलिंग युद्धाच्या नरसंहाराच्या क्रोधामुळे दु: खी होऊन बुद्धांची शिकवण आणि स्वतःच्या प्रायश्चित्तासाठी प्राण्यांची हत्या बंद केली, लोककल्याणासाठी त्यांनी रुग्णालय, शाळा, रस्ते आणि बरेच काही तयार केले. सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्म प्रचारात त्यांचा मुलगा महेंद्र याने श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार केला. तो त्या काळात सर्वात यशस्वी प्रचारक राहीला .

अशोक एक कर्तृत्ववान राजा होता. कार्यक्षम अनुशासन, लोककल्याणाभिमुख राज्यकारभार आणि सौजन्यपूर्ण धर्मप्रसार यांसाठी तो नावाजला जातो. अशोकाने अनेक शिलालेख, स्तंभलेख आणि गुह लोककल्याणाभिमुख राज्यकारभार आणि सौजन्यपूर्ण धर्मप्रसार यांसाठी तो नावाजला जातो. अशोकाने अनेक शिलालेख, स्तंभलेख आणि गुहालेख जागोजागी निर्माण केले. त्यांत राज्याचे शासन, शासकीय अधिकाऱ्याची लोकांसाठी बांधिलकी, आत्मसंयम, धर्म आणि सामान्य जनतेच्या सुवर्तनाबाबत विचार अशा विविध विषयांवर भाष्य केले गेले होते. तसेच मगध राज्यात येणाऱ्या परकीयांसाठी राज्यघटना आणि व्यवस्थापनाबाबत माहिती सीमा भागांतल्या शिलालेखांवर कोरली होती. अशोकाने तिसऱ्या बौद्ध धर्मपरिषदेचे पाटलिपुत्र (पाटणा) येथे आयोजन केले. कलिंग युद्धापश्चात साम्राज्यात सर्वत्र शांतता नांदत राहिल्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास झाला, राज्यांत स्थैर्य निर्माण झाले आणि अशोकाने घालून दिलेल्या मूल्यप्रणालींची जोपासना होऊ शकली. अफगाणिस्तानपासून बंगालच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशावर सार्वभौमत्व स्थापन करणारा अशोक भारतीय इतिहासातील एकमेव योद्धा होता. त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ भारतीय सम्राट मानला जातो.

– डॉ. घपेश पुंडलिक ढवळे
ghapesh84@gmail.com
M.8600044560

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका