“पक्षी सप्ताह”निमित्त पक्षीप्रेमीनी लुटला पक्षी निरीक्षणाचा आनंद
पक्षासंदर्भात प्रा. डॉ. विधिन कांबळे यांनी केले मार्गदर्शन
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत असून 8 नोव्हेंबर रोजी बुद्धेहाळ येथील तलाव परिसरात पक्षी प्रेमीसाठी पक्षी निरीक्षण व कोळा येथे वनक्षेत्र भेट व ट्रेकिंग आयोजित करण्यात आले होते. या कार्यकमास पक्षी प्रेमीनी उत्तम प्रतिसाद दिला. सकाळी सातच्या सुमारास बुद्धेहाळ येथील तलाव परिसरात विविध पक्षांचे पक्षीप्रेमीना दर्शन झाले. त्यानंतर या पक्षासंदर्भात प्रा. डॉ. विधिन कांबळे सर यांनी उपस्थिताना माहिती दिली.
कोळा येथील वन परिसरात ट्रेकिंगचा तसेच निसर्गाचा आनंद पक्षीप्रेमीनी लुटला. वन परिसरात भटकंती झाल्यानंतर बुद्धेहाळ येथे वनभोजनाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. डी.बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी वनपाल एस.एल.वाघमोडे वनरक्षक एस.जे.शिंदे, व्ही.पी.इंगोले, डी.एम.सावंत.वाहनचालक स्वप्नील दौंड, कोळा व जुनोनी येथील वनसेवक तसेच पक्षी प्रेमी ग्रुप सदस्य प्रा. विधिन कांबळे, प्राचार्य एस. के. पाटील, प्रकाश महाजन, विक्रम पवार, राजेंद्र यादव, संजय गव्हाणे, दीपक चोथे, महेश गुरव, मयूर भंडारे, अकबर बागवान, प्रा. सोमनाथ ऐवळे, दत्ता ऐवळे,अमोल बंडगर आदी उपस्थित होते.