पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या
मध्य रेल्वेने केले प्रसिद्धीपत्रक जारी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या जत्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर – पंढरपूर, पंढरपूर – मिरज आणि लातूर – मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
तपशील खालीलप्रमाणे-
१. लातूर – पंढरपूर विशेष (८ फेऱ्या)
ट्रेन क्र. 01281 अनारक्षित विशेष ट्रेन दि. १२.११.२०२१, १५.११.२०२१, १६.११.२०२१ आणि १७.११.२०२१ रोजी लातूर येथून ०७.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01282 अनारक्षित विशेष दि. १२.११.२०२१, १५.११.२०२१, १६.११.२०२१ आणि १७.११.२०२१ रोजी १४.०० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी १७.३० वाजता लातूर येथे पोहोचेल.
थांबे: हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.
संरचना: ६ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.
२. पंढरपूर – मिरज विशेष (६ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01283 अनारक्षित विशेष पंढरपूर आसन दि. १३.११.२०२१, १५.११.२०२१ आणि १६.११.२०२१ रोजी १०.१० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १३.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01284 अनारक्षित विशेष दि. १३.११.२०२१, १५.११.२०२१ आणि १६.११.२०२१ रोजी १३.३५ वाजता मिरज येथून सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.
थांबे: सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि आरग.
संरचना: ६ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.
३. लातूर – मिरज विशेष दैनिक (१२ फेऱ्या)
ट्रेन क्र. 01285 अनारक्षित विशेष दि. १२.११.२०२१ ते १७.११.२०२१ पर्यंत दररोज ०९.३५ वाजता लातूर येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १७.०० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01286 अनारक्षित विशेष दि. १२.११.२०२१ ते १७.११.२०११ पर्यंत दररोज २०.३० वाजता मिरज येथून सुटेल आणि लातूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.
थांबे: हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग.
संरचना: १४ द्वितीय आसन श्रेणी.
प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.