पंढरपूरात भाजपकडून राष्ट्रवादीचा “करेक्ट कार्यक्रम”

भाजप उमेदवार समाधान आवताडेेंचा नेत्रदीपक विजय

Spread the love

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा दारुण पराभव केला. राष्ट्रवादीच्याच भाषेत भाजपने राष्ट्रवादीचा “टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम” केला. अखेर समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी झाले.

समाधान आवताडे यांनी तीन हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे.

  • उमेदवारांना पडलेली मते
  • समाधान आवताडे १ लाख ९ हजार ४५०
  • भगीरथ भालके १ लाख ५ हजार ७१७
  • ३७३३ मताने समाधान आवताडे विजयी

कोरोना महामारीच्या एेन संकटात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजप तथा महायुतीकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आ. गोपीचंद पडळकर यांच्या जंगी सभा झाल्या. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. जयंत पाटील यांनी या मतदारसंघात ठाण मांडून परिसर पिंजून काढला होता.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनीही धनगर समाजाचा उमेदवार देऊन चूरस निर्माण केली होती. शिवसेना बंडखोर उमेदवार शैला गोडसेंनीही मोठ्या प्रमाणात प्रचारयंत्रणा राबवली होती.

अटीतटीच्या या निवडणुकीत रविवारी मजमोजणीवेळी पहिल्या काही फे-यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. मात्र हळूहळू समाधान आवताडे हे लीड घेत राहिले. २३ व्या फेरी अखेर समाधान आवताडे यांना ५७०८ मतांची आघाडी मिळाली होती. पंचविसाव्या फेरीअखेर आवताडे यांनी आपली मतांच्या आघाडीची घौडदौड कायम ठेवत २६ व्या फेरी अखेर त्यांनी ६२०० मतांची आघाडी घेतली. २९ व्या फेरीअखेर समाधान आवताडे ९४०० मतांनी आघाडीवर होते. मतांची ही आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके तोडू शकले नाहीत. ३१ व्या फेरीअखेर समाधान आवताडे 15 हजार 635 मतांनी आघाडीवर होते. 33 व्या फेरीअखेरही समाधान आवताडे आघाडीवर होते. 35 व्या फेरीअखेर आवताडे हे 4549 मतांनी आघाडीवर होते. 36 व्या फेरी अखेर समाधान आवताडे 4256 मतांनी लिडवर होते. समाधान आवताडे यांनी एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत शेवटच्या फेरीत भगीरथ भालकेंचा दारूण पराभव केला. निसटत्या मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.

• महाविकास आघाडीसाठी धक्कादायक निकाल

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात झालेला पराभव हा महाविकास आघाडीसाठी धक्कादायक निकाल मानला जात आहे. 2009 ची निवडणूक सोडली तर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत कै. भारतनाना भालके हे दहा ते पंधरा हजारांच्या फरकाने निवडून आले होते. मात्र त्यावेळी समाधान आवताडे आणि परिचारक यांच्या मतांची बेरीज जास्त होती. यंदा मात्र ते दोघेही एकत्र आल्यामुळे भाजपचा विजय सोपा झाल्याचे दिसून आले.

बिगबॉस फेम अभिजीतदादा बिचुकले यांना २३ व्या फेरीअखेर केवळ ६६ मते पडली होती.  विजयाकडे आगेकूच असल्याचे राहून आवताडे समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव केला.

 

(बातमी अपडेट होत आहे.)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका