राजरत्न आंबेडकर सोलापूर दौऱ्यावर
कै.गणपतराव देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट, आज सांगोल्यात राजरत्न आंबेडकरांची बैठक
सांगोला (विशेष प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे सोलापूर दौ-यावर येत आहेत. ते माजी मंत्री तथा सांगोल्याचे भाग्यविधाते कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
राजरत्न आंबेडकरांचा आज सोलापूर व सांगोला दौरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे आज (गुरुवार, ५ ऑगस्ट रोजी) सोलापूर व सांगोला दौ-यावर आहेत. सोलापुरात सकाळी 10 वाजता कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारनंतर ते सांगोला तालुक्यात येणार असून माजी आम. गणपतराव देशमुख यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय बौद्ध महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्धांचे प्रतिनिधित्व करत असून आपल्या देशातील बौद्धांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात यशस्वी झाले आहेत. सध्या भारतात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून देशातील महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आदी भागात धम्माचे काम जोमाने करीत आहेत.
राजरत्न आंबेडकर यांचे प्रथमच सांगोला तालुक्यात आगमन होत आहे. त्यांच्या समवेत सेक्युलर मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे व कार्याध्यक्ष तथा माजी सहा. पोलिस आयुक्त भरत (अण्णा) शेळके उपस्थित राहणार आहेत. माजी आम. गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यानंतर भीमनगरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष तानाजी बनसोडे व सेक्युलर मूव्हमेंटचे तालुका समन्वयक अॅड. सुनील जगधने यांनी पत्रकारांना दिली.
गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ डिकसळमध्ये साकारणार ‘भाईंची देवराई’; १० ऑगस्ट रोजी शुभारंभ
सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ