नागेश बनसोडे यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या सामाजिक संघटनेचा राष्ट्रसंत गाडगे बाबा समाजगौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोनासारख्या महामारीशी सामना करत आहे आणि अशा महामारीमध्ये जिवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे आणि त्यांना पंतप्रधान आरोग्य योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनांवर काम करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागेश बनसोडे.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्याचे सुपुत्र तथा महात्मा फुले जन आरोग्य योजना तालुका समन्वयक नागेशजी बनसोडे यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या सामाजिक संघटनेचा राष्ट्रसंत गाडगे बाबा समाजगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच प्रमाणे आरोग्य ही एक अतिशय महत्त्वाची जनसामान्यांची गरज बनली आहे. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोनासारख्या महामारीशी सामना करत आहे आणि अशा महामारीमध्ये जिवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे आणि त्यांना पंतप्रधान आरोग्य योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनांवर काम करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागेश बनसोडे.

त्यांनी दरवर्षी हजारो रुग्णांना अगदी मोफत उपचार या योजनांद्वारे मिळवून दिला आहे. सन 2012 पासून नागेश बनसोडे हे या योजनेवर कार्यरत आहेत. रात्री-अपरात्री कधीही कोणत्याही नागरिकांनी फोन केला तर त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांच्या उपचारादरम्यान त्यांना तत्पर मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून यांना ओळखले जाते.

खरंतर कोरोना काळातील त्यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. ज्यावेळी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता होती त्यावेळी त्यांनी अतिशय खडतर परिश्रम करून गोरगरीब पेशंटला बेड मिळवून दिले त्या काळामध्ये बनसोडे यांनी खरोखर अगदी तारेवरची कसरत केली. यामुळे त्यांची त्यांच्या कार्य भागांमध्ये नागरिकातून कौतुक व्यक्त केले जात आहे.

यामध्ये कोविड पेशंट, फॅक्चर पेशंट, हृदयाचे आजार, लहान बालकांचे आजार, अशा असंख्य आजाराच्या रुग्णांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळवून दिले आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 1209 इतक्या आजारांवर मोफत उपचार दिले जातात.

यामुळेच यांच्या कार्याची दखल घेऊन आणि गोरगरीब जनतेच्या प्रति असणारी तळमळ पाहून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे त्यांचे सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या भागातून अभिनंदन व कौतुक व्यक्त केले जात आहे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका