ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनरोजगार/शिक्षण
Trending

नागराज मंजुळे पोहोचला मित्राच्या परीक्षेसाठी सोलापूर विद्यापीठात

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यासोबतही साधला संवाद

Spread the love

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात चित्रपट निर्मिती या विषयावर कार्यशाळा घेऊ तसेच त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यास मला आवडेल, असे यावेळी बोलताना श्री मंजुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यापीठ परिसराची पाहणी केली. तसेच मास कम्युनिकेशन विभागाला भेट देऊन टीव्ही व रेडिओ स्टुडिओची पाहणी करून आनंद व्यक्त केला.

सोलापूर : विशेष प्रतिनिधी
सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नागराज मंजुळे यांनी सोमवारी आपल्या मित्राच्या पीएच.डी.च्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात हजेरी लावली. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

नागराज मंजुळे यांचे मित्र विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे यांच्या पीएच.डी.ची खुली मौखिक परीक्षा सोमवारी दुपारी होती. प्रा. साठे यांनी सैराट चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारलेली आहे. ते मंजुळे यांचे गाववाले मित्र आहेत. प्रा. साठे यांनी प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली आहे. सोमवारी त्याची अंतिम खुली मौखिक परीक्षा होती. त्यासाठी खास श्री मंजुळे हे उपस्थित राहिले.

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास सोमवारी सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नागराज मंजुळे यांनी भेट दिली. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, डॉ. महेंद्र कदम, डॉ. केदारनाथ काळवणे व अन्य.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी श्री मंजुळे यांनी कुलगुरू दालनात येऊन डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या.

यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह डॉ. महेंद्र कदम, डॉ. केदारनाथ काळवणे, प्रा. साठे, डॉ. मलिक रोकडे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. दत्ता घोलप आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात चित्रपट निर्मिती या विषयावर कार्यशाळा घेऊ तसेच त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यास मला आवडेल, असे यावेळी बोलताना श्री मंजुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यापीठ परिसराची पाहणी केली. तसेच मास कम्युनिकेशन विभागाला भेट देऊन टीव्ही व रेडिओ स्टुडिओची पाहणी करून आनंद व्यक्त केला.

प्रा. संजय साठे यांनी “१९८० नंतरच्या मराठी कवितेतील स्त्री प्रतिमा” या विषयावर संशोधन करून पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. डॉ. महेंद्र कदम यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

संजय साठे हे उत्तम चित्रकार, कवी, अभिनेता, गायक आहेत. अत्यंत मन लावून त्यांनी हे संशोधन केले आहे. या मौखिकीसाठी प्रा. संजय साठे यांचे मित्र नागराज मंजुळे आवर्जून उपस्थित होते. मैत्र कसे सांभाळावे, याचा आदर्श म्हणजे नागराज मंजुळे होय. संजय साठे यांच्या केवळ मैत्रीसाठी सगळी कामे बाजूला ठेवून नागराज मंजुळे उपस्थित होते.

या मौखिकीसाठी बहि:स्थ परीक्षक डॉ. अरुण शिंदे, अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. सिद्राम सलवदे उपस्थित होते.

देशात हजारो निर्घृण हत्या, श्रद्धा-आफताब प्रकरणाचीच का चर्चा?

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका