नव्या युगाचे आधुनिक पत्रकार बना!
मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात एम.ए. मास कम्युनिकेशन (पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमासाठी २५ नोव्हेंबर रोजी प्रवेशपूर्व परीक्षा (Entrance Exam).
- ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरु.
- १७ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख.
- दीड कोटी रुपये खर्चून साकारलेला अत्याधुनिक टीव्ही व कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन (पत्रकारिता व जनसंज्ञापन) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यास Entrance Exam. देऊन प्रवेश प्राप्त करता येतो. पत्रकारितेच्या या आव्हानात्मक व शाश्वत करिअरच्या क्षेत्रात येऊ इच्छिणा-यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधितच मोठी झेप घेतली आहे. या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना करिअरची नवनवीन क्षेत्रे खुणावत आहेत. सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागही जबाबदार आणि परिपूर्ण पत्रकार घडविण्यासाठी यापूर्वीपासूनच नवोपक्रमासह कौशल्ययुक्त व दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. या विभागात शिकलेले असंख्य विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक, मुद्रित व डिजिटल माध्यमांत चांगल्या पगारासह महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या विभागातील बी.व्होक. (जर्नालिझम) या पदवी अभ्यासक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एम.ए. मास कम्युनिकेशन प्रवेश प्रक्रिया सुरु
या विभागातील एम.ए. मास कम्युनिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र आहे. यासाठी विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व परीक्षेचे (Entrance Exam.) आयोजन ऑनलाइन स्वरुपात करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबर २०२० ही या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. यासाठी रु. ४००/- परीक्षा शुल्क आहे. ते आॅनलाइन स्वरुपातच भरता येते. विद्यापीठाच्या वेबसाईवर Admission and Eligibility ला क्लिक केल्यावर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यात तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यावर OTP येईल तो OTP टाकल्यावर फॉर्म भरण्यासाठी ‘सोशल सायन्स’ची निवड करून त्यात ‘मास कम्युनिकेशन’ अभ्यासक्रमाची निवड करावी व पुढील फॉर्म भरावा. (काही तांत्रित अडचण आल्यास या बातमीसोबत अपलोड केलेल्या जाहिरातीत तळाशी नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावरुन तुम्ही विभागातील शिक्षकांशी संपर्क करु शकता.) मास कम्युनिकेशनची प्रवेशपूर्व परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन स्वरुपात होईल. त्यासाठीचे एक्झाम सेंटर निवडीचे पर्याय तुम्हाला आॅनलाइन अर्ज भरताना निवडता येतील. १ डिसेंबर २०२० रोजी निकाल जाहीर होईल. ४ डिसेंबर रोजी प्रवेशाची पहिली फेरी व ८ डिसेंबर रोजी प्रवेशाची दुसरी फेरी होईल.
अत्याधुनिक टीव्ही व कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ
मास कम्युनिकेशन विभागात दीड कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक टीव्ही व कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उभारण्यात आला अाहे. अत्याधुनिक व्हिडिओ शूटिंग कॅमेरे, व्हिडिओ व ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर्स, अत्याधुनिक माईक्स, व्हिडिओ व ऑडिओ मिक्सर, टेलीप्रॉम्पटर, डिजिटल वॉल, क्रोमा स्क्रीन, अत्याधुनिक लाईट सिस्टीमसह वातानुकुलीत, साऊंडप्रूफ सुविधांनी युक्त असा हा स्टुडिओ आहे. यामध्ये कम्युनिटी रेडिओ स्टुडिओचाही समावेश आहे. या विभागात पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. या स्टुडिओत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रत्यक्ष तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. प्रात्यक्षिकांवर सर्वाधिक भर असल्याने येथे नव्या युगाचे आधुनिक व कौशल्ययुक्त पत्रकार घडत आहेत.
विविध माध्यमांत नोकरीच्या संधी
मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध माध्यमांत व शासकीय विभागात नोकरीची संधी प्राप्त होते. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, एफ.एम., आॅनलाईन मीडिया, सिनेमा, जनसंपर्क, जाहिरात, माहिती व जनसंपर्क विभाग तसेत विविध खासगी व शासकीय विभागांतील जनसंपर्क अधिकारी अशा विविध क्षेत्रांत नोकरीची संधी प्राप्त होते.
अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क
एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात प्रवेश घेण्यासाठी इतर विद्यापीठांच्या तुलनेत अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क आकारले जाते. आरक्षित गटासाठी १,३१८ रुपये, तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ७, ४३२ एवढे माफक शुल्क आहे. (खुल्या गटातील विद्यार्थी दोन टप्प्यांत शुल्क भरु शकतात.)
पत्रकारितेत स्वत:चे करिअर घडवू इच्छिणा-यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने Entrance Exam. साठी आॅनलाइन अर्ज दाखल करावा व आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले आहे.
ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीची लिंक
https://su.digitaluniversity.ac/
http://ictrdexams.in/PAHSUCET/
हा अर्ज दाखल करताना काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर आपण संपर्क करु शकता.
विभाग प्रमुख
• डॉ.आर.बी. चिंचोलकर सर
9860091855
सहाय्यक प्राध्यापक
• डॉ. अंबादास भासके
9822883978
• कु. तेजस्विनी कांबळे
9860067388
• डॉ. बाळासाहेब मागाडे
9503376300
• श्री. ऋषिकेश मंडलिक
9260489383
——————————————————–
विभागप्रमुख
डॉ. रवींद्र चिंचोलकर
(मास कम्युनिकेशन विभाग)
संचालक
प्रा.डॉ. गौतम कांबळे
(सामाजिकशास्त्रे संकुल)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ