नवा व्हेरिएंट : राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवार यांचे संकेत
महाराष्ट्रावर पुन्हा लॉकडाऊनचे सावट
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला तरी परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आज आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधानत मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेणार आहेत. काही बंधनं आणावी लागतील, अशी स्थिती आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. (new coronavirus variant found) तर WHO कडून नव्या व्हेरियंटचं नाव ओमिक्रॉन असे देण्यात आले आहे. या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊनची भीती व्यक्त होत आहे. आता भारतातही निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. (new coronavirus variant found) तर WHO कडून नव्या व्हेरियंटचं नाव ओमिक्रॉन असे देण्यात आले आहे. या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊनची भीती व्यक्त होत आहे. आता भारतातही निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी 50 टक्केच बंधन हटवण्यात आले आहे. शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. कोविडमुळे मृत्य झालेल्याच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा GR काढलेला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
पुणे तसेच पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर तसेच ठेवणार आहोत. 31 डिसेंबरला आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवला नियमांचे पालन करून परवानगी देण्यात आली आहे. तर सिनेमा आणि नाट्यगृहची संख्येची मर्यादा असणार नाही, असे ते म्हणाले.
नव्या व्हेरिएंटचा धोका किती, उपाय काय? A टू Z माहिती
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नवीन स्वरूपाला घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन ICMRचे माजी संचालक डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले. कोरोना प्रतिबंधक लस घेणे आणि कोविडबाबतची खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.
यां विषाणूमुळं दवाखान्यात भर्ती व्हावं लागतंय, का मृत्यू जास्त होत आहेत का याबाबत अधिक स्पष्टता नसल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले. आफ्रिकेतील परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे यासाठी काही वेळ आहे. अर्थात काळजी घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिस्थिती अजून गंभीर झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. या विषाणूमध्ये 50 म्युटेशन आहेत. लस घेतली म्हणून कोविड खबरदारीचे नियम पाळणार नाही अशी भावना बाळगणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांनी प्राधान्याने लस घ्यावी असेही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले.