‘नवाब मलिक, पिक्चर में मेरा रोल अभी बाकी है!”
वानखेडे-मलिक वादात ना.रामदास आठवलेंची धमाकेदार एन्ट्री
मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या वादात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धमाकेदार एंट्री केली आहे. नवाब मलिक म्हणत असतील की, पिक्चर अभी बाकी है, मलिक साहेब पिक्चर में मेरा रोल अभी बाकी है!” असे म्हणत ना. आठवले यांनी धमाकेदार एंट्री केली. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर- वानखेडे, समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी रविवारी ना. आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ना. आठवले म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही. आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे. नवाब मलिक म्हणतात पिक्चर अजून बाकी आहे . पण या पिक्चरमध्ये माझा रोल बाकी आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. क्रांती रेडकर यांनी मला सर्व कागदपत्रं दाखवली. कागदपत्र अधिकृत आहेत. वानखेडे कुटुंबीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत. समीर वानखेडेंविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. जर तुमचे काही आरोप असतील तर कोर्टात जा. जावयावरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप करण्यात येत आहेत.
ना. आठवले पुढे म्हणाले की, आर्यन खान याने ड्रग्स घेतले नव्हते तर मग कोर्टाने 22 दिवस जमीन का दिला नाही ? पंच प्रभाकर साईल याला पैसे देऊन वानखेडेंविरोधात उभे केल्याचा आमचा आरोप आहे. समीर वानखेडे यांची बाजू घेताना आठवले म्हणाले की, समीर वानखेडे यांच्याविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातेय. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. समीर वानखेडे यांना पैसे घ्यायचे असते तर मग त्यानी 19 जणांना अटक केली नसती. समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही. आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे.
नवाब मलिक म्हणतात, यांना भेटणं योग्य नाही. नवाब मलिक जरी माझ्या घरी आले त्याना सुद्धा मी भेटेन असे म्हणत ना. आठवले यांनी धुराळा उडवून दिला.