नरक चतुर्दशीदिवशी ‘अशी’ करा पूजा
जीवनातील सर्व सुखं होतील प्राप्त
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
दिवाळी सणात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. उद्या, गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी योगायोगाने नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे पूजाविधी एकाच दिवशी आले आहेत. या दिवसाला नरक चतुर्दशी, रूप चतुर्दशी किंवा छोटी दीपावली असेही म्हणतात. नरकासुर राक्षसाच्या वधाचा आनंद साजरा करण्यासाठी नरक चतुर्दशी हा सण साजरा करतात. नरक चतुर्दशी निमित्त ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. शरीराला सुगंधी तेल आणि उटणे लावून मालीश करतात नंतर गरम पाण्याने आंघोळ करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरली जाते. नरक चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व काय आहे व यादिवशी पूजा कशी करावी? हे वाचा.
नेमका इतिहास काय?
‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.
आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. नरकासुर नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.
पूजेची पद्धत
नरक चतुर्दशी निमित्त काही घरांमध्ये पहाटे (सूर्योदयाआधी) आंघोळीनंतर शंकराचे पूजन केले जाते. तर काही घरांमध्ये पहाटे (सूर्योदयाआधी) आंघोळीनंतर यम, श्रीकृष्ण, काली माता, शंकर, मारुती (हनुमान), वामन या सहा देवतांची पूजा करण्याची पद्धत आहे. पूजन करण्याआधी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस दोन्ही कोपऱ्यांना पणती (दिवा) ठेवतात. संध्याकाळी घरातील प्रमुख व्यक्ती हरभरा डाळ, खीळ-बताशे, अगरबत्ती, पाणी, मोहरीच्या तेलाचा दिवा आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर, अगरबत्ती लावा आणि “ओम धूम धुमम् धुमावती स्वाः” या मंत्राचा जप करा. माता धुमावती (दारिद्र्याची देवी) कडे प्रार्थना करा की हे माता, आपल्या घरातून, कुटुंबातून आणि व्यवसायातून वर्षभर दारिद्र्य, रोग, दोष, वाईट नजर नाहिशी होवो. लोटाची प्रार्थना करून, ग्लास पाण्याने भरून घराच्या मुख्य दरवाजाच्या दाराच्या चौकटीवर ठेवून घरात प्रवेश करून नाल्याच्या बाजूला असलेल्या मुख्य दरवाजावर जळत असलेला अगरबत्ती, दिवा आणि दिवा लावा. असे केल्याने पूजकांच्या कुटुंबात आई धुमावतींचा आशीर्वाद वर्षभर राहतो.
दिवा लावण्याची आणि पूजा करण्याची सर्वोत्तम वेळ
दिवा लावण्याची आणि पूजा करण्याची सर्वोत्तम वेळ सायंकाळी 07:30 ते 08:30 वाजता आहे. यावेळी, जगप्रसिद्ध चोघडिया मुहूर्तानुसार, संध्याकाळ आणि प्रदोष दोन्ही काळ समाविष्ट केले जातील, जे कोणत्याही कार्यासाठी सर्वोत्तम आहे. या चोघडिया दरम्यान “शुभ” चा मुहूर्त उपलब्ध होईल, ज्यामध्ये उपासकांना सर्व प्रकारचे लाभ आणि प्रगती मिळेल.
(संदर्भ : Wikipidia, Online Source)