धनगर समाजसेवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद : नगराध्यक्षा राणीताई माने
भाईंच्या देवराईतील स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा उत्साहात
- हेही वाचा :
- “राजकीय सौहार्दाचा वस्तुपाठ”; हे फक्त सांगोल्यातच घडू शकते
- ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
सांगोला / विशेष प्रतिनिधी
सांगोल्यातील धनगर समाजसेवा मंडळाचे समाजसेवेचे कार्य महान आहे. त्यांनी आतापर्यंत गोरगरीब गरजूंना मदतीचा हातचं दिला आहे. आज स्व.आबासाहेबांच्या स्मरणार्थ उभारलेल्या देवराई प्रकल्पास १ लाख रुपयाची स्वागत कमान देवून या देवराईची शोभा वाढविली आहे. त्यामुळे या मंडळाचे कार्य महान असल्याचे नगराध्यक्षा राणीताई माने यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे तालुक्याचे भाग्यविधाते स्व.आम. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली आहे. या कमानीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब देशमुख तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा राणीताई माने या होत्या.
यावेळी गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नगरसेवक प्रशांत धनवजीर, नगरसेवक सुरेश माळी ,रासप जिल्हाध्यक्ष सोमा मोटे, राजू वाघमारे, मंडळाचे अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर, प्रा. कामाजी नायकुडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी या कमानीचे उद्घाटन मान्यवर मंडळीच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना नगराध्यक्षा राणीताई माने म्हणाल्या की, हे देवराईचे खूप मोठे काम आहे. यामुळे वृक्षसंर्धनाचे काम तर होत आहेच उलट गावाचेही नाव होत आहे. नाना हालंगडे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. याला सांगोल्यातील धनगर समाजसेवा मंडळाने स्वागत कमान देवून शोभा आणलेली आहे.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, भाईंची देवराई ही सध्या नावारूपाला आलेली आहे. यासाठी सर्वांनीच मदतीचा हात दिलेला आहे. इथून पुढे ही मदत अशीच राहील. आज दोन महिन्यानंतर भेट दिल्यानंतर प्रसन्न वाटले. झाडांची वाढ ही चांगली आहे. असे हे वृक्षसंवर्धनाचे काम चांगले केले आहे. यातून आबासाहेबांच्या आठवणी तर जागविल्या जातीलच. हे खूप चांगले काम आहे. धनगर समाजसेवा मंडळानेही हे देवराईचे नाव उज्वल केले आहे, असेही डॉ. देशमुख यांनी शेवटी सांगितले.
यावेळी सरपंच शशिकला बाबर, बाळूबाई गेजगे मॅडम, महादेवी हालंगडे, उपाध्यक्ष दत्तात्रय बंडगर, सचिव बंडोपंत येडगे, खजिनदार राजाभाऊ मदने, संचालक सुरेश कोळेकर, कामाजी नायकुडे , युवराज माने , बिरुदेव शिंगाडे , दिलीप नरुटे , ज्ञानेश्वर गाडेकर , भिवा मेटकरी , सुरेश गावडे , बाळासाहेब व्हटे , भीमराव देवकते , दिलीप मस्के , सल्लागार , प्रा . संजय शिंगाडे , बाळासाहेब गावडे , चिंतामणी माने , संदिपान नरुटे , आनंदा व्हटे , बापूराव जानकर, चिदानंद स्वामी सर,मधुकर बाबर,रानोबा करांडे, बंडू वाघमोडे, मधुकर गोरड अनिल गायकवाड, अनिल खरात ,महेश बंडगर , ॲड,महादेव पारसे ,सुरेश पारसे,अनिल कुलकर्णी,मुकेश साबळे,अप्पा भुसनर ,तुकाराम गोरड, काकासो करांडे सर, सोपान करांडे, दादासो भूसनर वनरक्षक राजकुमार कौठाळे, दगडू करांडे, संदीप भुसनर , बापू करांडे यांच्यासह देवराई प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम भुसनर सर यांनी तर आभार विनायक कुलकर्णी यांनी मानले.