धक्कादायक, सोलापुरातील तरुण पत्रकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू
सोलापूरच्या माध्यम क्षेत्रावर शोककळा
आज दुपारी घरी असताना खलील यांना अटॅक आल्यानंतर तातडीने दमानी नगरातील लोटस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तातडीने सोलापूर रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. तेथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.
सोलापूर : सोलापुरातील आघाडीचे न्यूज चॅनल बी आर न्यूजचे पत्रकार खलील अ. हाफिज शहानुकर (वय 40) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी 11 वाजता दमानीनगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. मोदी कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
गेल्या 20 वर्षापासून ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत होते. दिनमान चॅनलपासून त्यांनी कामास सुरुवात केली. त्यानंतर दूरदर्शन, साम टीव्ही, मी मराठी आदी चॅनेलमध्ये त्यांनी काम केलं. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केलं.
आज दुपारी घरी असताना खलील यांना अटॅक आल्यानंतर तातडीने दमानी नगरातील लोटस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तातडीने सोलापूर रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. तेथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.
दमाणीनगर भागात ते रहात होते. दुपारी अचानक त्रास होऊ लागल्याने दमानीनगर भागातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलकडे हलविण्याचा सूचना केल्या. दरम्यान, मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुःखद घटनेने माध्यम क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
खलील हे उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून त्यांची सोलापुरात एक वेगळी ओळख होती. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘दिनमान’ या चॅनेलमधून झाली त्यानंतर ‘मी मराठी’ या प्रादेशिक वाहिनीसाठी त्यांनी कॅमेरामन म्हणून काम केले. पुढे सोलापूर शहरातील इतर स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये काम केल्यानंतर सध्या ते बी आर न्यूज चॅनलमध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते. अतिशय मनमिळावू असं व्यक्तिमत्त्व होतं क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांचा माध्यमात मोठा दबदबा होता.