आरोग्यगुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशल
धक्कादायक; एखतपुरात भिंत पडून महिला जागीच ठार

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील एकतपूर येथे सततच्या पावसामुळे घराची भिंत फुगून ती भिंत अंगावर पडली आणि त्यात एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
छबाबाई बबन पाटोळे असे मृत महिलेचे नाव आहे.
एखतपूर येथे मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे छबाबाई बबन पाटोळे यांचे दगडाचे घर फुगले. भिंत फुगल्यामुळे अंगावर भिंत पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

तसेच त्यांचे पती बबन सिताराम पाटोळे वय 60 हे पायावर भिंत पडल्यामुळे जखमी असून त्यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे उपचार चालू आहेत.
महाराष्ट्रात करचुकवेगिरी करणाऱ्या बड्या उद्योगांवर मोठी कारवाई
सांगोल्याचा जनावरांचा बाजार बंद
पाहा खास व्हिडिओ