ताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

द्वेषाने नव्हे, प्रेमाने जग जिंकू

आज व्हॅलेन्टाईन डे, करू संकल्प

Spread the love

रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
द्वेषाने नव्हे प्रेमाने जग जिंकता येते हा जगाचा इतिहास आहे. हाच इतिहास उजागर करण्याचे कार्य व्हॅलेन्टाईन डेनिमित्त केले होते. आज साजरा होणारा व्हॅलेन्टाईन डे नेमका का साजरा केला जातो, यालाही इतिहास आहे.

वाचा सविस्तर…

(Advt)

रोमचा राजा प्रेमविवाहावर विश्वास ठेवत नव्हता. रोमच्या राजाचा असा विश्वास होता की प्रेम किंवा प्रेमप्रकरणामुळे रोम किंवा एखाद्याकडे झुकल्यामुळे सैनिकांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे राजा क्लॉडियसच्या रोममध्ये सैनिकांच्या लग्नावर बंदी घालण्यात आली होती. संत व्हॅलेंटाईन यांना हे अजिबात आवडले नाही आणि त्यांनी याविरोधात आवाज उठवला आणि निषेध केला. इतकेच नाही तर सेंट व्हॅलेंटाईनने रोमच्या राजाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन लग्न केले.

विवाह 14 फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाहाच्या स्वरूपात झाले. यामुळे 14 फेब्रुवारीला सेंट व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली. तेव्हापासून संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. संत व्हॅलेंटाईन यांनी आपल्या प्रियजनांसाठी आपले प्राण बलिदान दिले. आता संपूर्ण विश्वात त्यांच्या स्मरणार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. संपूर्ण जग त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून हा दिवस साजरा करते.

हा उत्सव सर्वप्रथम रोममध्ये 496 मध्ये उत्सव म्हणून सुरू झाला होता. यानंतर, 5 व्या शतकात रोमच्या पोप गेलेसियस यांनी सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केले. तेव्हापासून तो जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

१४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!

(Advt.)

संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबले.

व्हॅलेंटाइनला फाशी

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचे जेलरच्या मुलीवर प्रेम बसले. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून इसवी सन २६९ च्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाइन, तुझा चाहता’ असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे.

मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो

वेगवेगळ्या देशात व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येकासाठी प्रेमाच्या संकल्पनाही वेगवेगळ्या असतात. एखादा मुलगा आपल्या ७० वर्षीय आजीलाही गुलाब देऊ तिला व्हॅलेंटाइन बनवू शकतो. एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाइन असू शकेल? मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हाच व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ आहे.

भारतात मोठ्या प्रमाणावर हा दिवस प्रेमी युगलांकडून साजरा केला जातो. तथापि, ‘व्हॅलेन्टाईन्स डे हा आपल्या संस्कृती विरुद्ध आहे’ असे म्हणून भारतातील बजरंग दल व इतर कट्टरता वादी हिंदू धार्मिक संघटनांना याला विरोध करतात आणि प्रेमी युगलांना धमक्या देत मारहाण करतात. असे असतानाही व्हॅलेंटाईन डे भारतामध्ये जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहे.

जगातील प्रत्येक बंधन हे प्रेमाने बांधलेले असते. जर प्रेम नसेल तर आयुष्यात आनंद येऊ शकणार नाही. तसंच प्रेमाबाबत आपल्या मनातील गोष्टी या समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी कोणताही मुहूर्त नसतो. प्रेमाचा आदर करणे, प्रेमाची भावना हा एक सुंदर अनुभव आहे. एकमेकांबरोबर आयुष्य काढताना अनेक चढउतार तर येतातच. पण त्याग, विश्वास आणि प्रेमाने हे आयुष्य एकत्र अप्रतिमरित्या निघून जाते आणि त्याच प्रेमाचा वारंवार आठवण करून देणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे (valentine day in marathi). जे प्रेम तुम्ही तुमच्या मनात सतत अनुभवता तेच तुम्ही ज्या व्यक्तीवर करता त्यांना सांगणे म्हणजे व्हॅलेंटाईन डे (valentine day information in marathi). पण हे शब्दात मांडणे नक्कीच सोप्पे नाही.

आयुष्यात प्रेम म्हणजेच सर्व काही आहे आणि त्यासाठी वेळ काढणंही महत्त्वाचे आहे. सध्या वेळेची कमतरता खूपच भासते आणि म्हणूनच प्रेमाचा हा एक दिवस प्रेमी युगुलांना एकत्र वेळ देण्यासाठी योग्य ठरतो. कारण वेळ निघून गेली तर ती परत येणार नाही हेच हा दिवस सांगत असतो. दिवाली, रक्षाबंधन, ख्रिसमस, होळी हे सण ज्याप्रमाणे साजरे करण्यात येतात, त्याप्रमाणेच प्रेमाचा हा दिवस सण म्हणूनच हल्ली साजरा करण्यात येतो.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका