देशी गायी संपविण्याचे षडयंत्र!
देशी गाईचे महत्त्व पटवून देणारा खणखणीत लेख
रविवार विशेष/ डॉ. नाना हालंगडे
देशात सध्या दररोज लाखो देशी गायींचे संकरीकरण करुन त्याना नासविण्यात येत आहे. असा अनैसर्गिक प्रयोग होणारा जगातील एकमेव प्राणी म्हणजे भारतीय देशी गाय होय. देशी गाय भारतातून संपविण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे.
भारतीय वंशाच्या वळूंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवून त्याना नासविण्यात आले. जणू हे देशी गायी संपविण्याचे षडयंत्रच आहे.
खेडोपाडी असे वीर्य पाठविण्यासाठी एसटी बसेसची मदत घेण्यात आली. खाजगी पशुवैद्यक डॉक्टराना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या विर्याने भरविण्यासाठी पाचशे रुपये व संकरीत (नासविलेले) वासरु जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले.
संबंधीत शेतक-यांना देखील पैश्याचे अमिष दाखविण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजूनदेखील सुरु आहे. सर्व बाजुंनी प्रयत्न करुन भारतामधून देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले.
दुर्देवाने हा कट 99% यशस्वी झाला असून आता फक्त आपल्या देशात 1% देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरुन न येणारे अतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षात शिल्लक असलेल्या देशी गायी देखील नामशेष होतील व त्याना फोटोमधे पाहण्याची वेळ येइल.
बाहेरुन देखावा करण्यासाठी देशी गायींचे संकरीकरण दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी करत असल्याचा कांगावा करण्यात आला. पण हे सपशेल खोटे आहे कारण संकरीकरणामुळे गायीचे दुधाचे उत्पादन वाढलेलेच नाही. पूर्वीच्या शुध्द देशी गायी भरपूर दुध देत होत्या. त्या नामशेष केल्या गेल्या. देशी गायींचे शुध्द बीज (वळू) नष्ट केले गेले. त्यांच्या खाद्याकडे दुर्लक्ष केले गेले.
कृषी शिक्षणातून देशी गायी दूध देत नाहीत. त्यामुळे त्यांचे culling (कत्तल) करुन जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी पाळले पाहीजेत असे विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या पध्दतीने बिंबविले गेले. संकरीकरणामुळे दूध विषारी व रोगकारक बनले. आजही देशाच्या दुग्ध उत्पादनात साठ टक्क्यांहून अधिक वाटा म्हशींच्या दुधाचा आहे. मग गायींचे संकरीकरण करुन काय साध्य झाले ?
भारतीय गीर (काठीयवाडी) गाय
ब्राझीलमधे एका दिवसाला 64 लिटर दुध देते. केनिया सारख्या मागास आफ्रिकन देशातील शास्त्रद्न्यानी भारतातून गीर गायी नेऊन त्यांचे शुद्ध स्वरूपात जतन करुन एका गीर गायीपासुन दिवसाला ५६ लिटर इतके दुध उत्पादन मिळविले आहे. भारतीय गीर गायीला जगामधे सर्वात जास्त दुध देणारी गाय म्हणून जागतिक मान्यता मिळाली आहे. मग प्रश्न असा पडतो की आपल्याला जर दुधाचे उत्पादन वाढवायचे होते तर मग देशी गीर, लाल सिंधी, साहीवाल, कांकरेज या भरपुर दुध देणाऱ्या देशी गायींचा शेतकऱ्यांमधे का प्रसार केला नाही?
शासकीय योजना राबवुन गीर गायी शेतक-यांना का दिल्या नाहीत?
संकरीकरण करुन देशी गायी नासविण्याची काय गरज होती ?
आश्चर्य म्हणजे गेल्या पन्नास वर्षात भारतातून देशी गायी अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नेण्यात आल्या. तेथे त्यांचे शुध्द स्वरुपात उत्तम संगोपन करण्यात आले.
भारतातूनच नेलेल्या देशी गायी हे देश आंतरराष्ट्रीय बाजारात एकाला गायीला तिन ते चार कोटी या किमतीला विकत आहेत.
मुळ भारतातून नामशेष केलेली ब्राह्मण ही भारतीय देशी गायीची जात आज अमेरिकेत आहे. अमेरिका या गायीला करोडो रुपये घेउन ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशाना विकत आहे. मलेशियाच्या राष्ट्रीय कॅलेंडर मधे भारतीय देशी गायीला स्थान दिले आहे.
प्रत्येक भारतीय गायीच्या जातीवर संशोधन करणाऱ्या कंपन्या ब्राझील, अमेरिकेमधे कार्यरत आहेत. अमेरिकेने भारतीय गायींवर संशोधन करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करुन संशोधन प्रकल्प सुरु केला आहे. अमेरिकेमधे भारतीय गायीचे दूध ( A2 milk ) नावाने मोठमोठ्या मॉलमधून विक्री केले जात आहे.
आपल्या देशातील कृषी शास्त्रज्ञ मात्र देशी गाय आणि जर्सी् प्राणी यामधील फरक व जर्सीच्या दुधाचे घातक परिणाम जाणुनबुजुन धोरण ठरविणाऱ्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आणुन देत नाहीत आणि खरे वास्तव जनतेपासून लपवून ठेवत आहेत.
जर्सीचे दूध पिल्याने भारतातील मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज जगातील सर्वातजास्त मधुमेही रुग्ण भारतात आहेत. ज्या ज्या घरी संकरीत जर्सी होल्स्टेन यांचे दूध पिले जाते तिथे हमखास मधुमेहाचे रोगी तयार झाले आहेत. अगदी चार पाच वर्ष वयाच्या लहान मुलांमध्ये देखील मधुमेह रोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
मूळ जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी 1.5 ते 2 टन वजनाचे असतात. त्यांच्या वासराचे वजन 22 किलो असते. देशी गायीचे वजन ५०० किलो असून वासराचे वजन ११ किलो असते. ज्यावेळेस देशी गायीचा जर्सी सोबत संकर केला जातो तेव्हा २२ किलो वजनाचे संकरित वासरू गायीला ९ महीने पोटात वाढवावे लागते. गायीला विताना प्रचंड त्रास होतो. कित्येक गायींचे विताना अंग बाहेर पडते. अनेकदा गायी मरण पावतात. संकरीकरणाचा देशी गायीच्या प्रजनन संस्थावर अतिशय वाईट परिणाम होतो.
देशात सध्या दररोज लाखो देशी गायींचे संकरीकरण करुन त्याना नासविण्यात येत आहे. असा अनैसर्गिक प्रयोग होणारा जगातील एकमेव प्राणी म्हणजे भारतीय देशी गाय होय. देशी गाय भारतातून संपविण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन संकरीकरणावर तातडीने बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे. नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरुपी गमावुन बसू.
हे संकरीकरण असेच चालू राहीले तर येत्या पाच वर्षानंतर मूळ देशी गायी नामशेष होतील व जर्सीसारखे घाणेरडे प्राणी गाय म्हणुन सांभाळण्याची वेळ जनतेवर येईल म्हणुन संकरीकरण तातडीने बंद होण्याची गरज आहे तरच कायद्याचा गोरक्षणाचा मूळ उद्देश सफल होईल.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दशकात ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशांनी भारतातुन देशी गायी नेऊन त्यांचे शुद्ध रुपात उत्तम संवर्धन केले आहे.ब्राझीलमधे 60 लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत तर भारतात फक्त तिन हजार शुध्द गीर गायी शिल्लक आहेत.
ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी गीर गायीची शुध्द रुपात उत्तम जोपासना करुन दिवसाला 64 लिटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे. ब्राझीलच्या एकुण दुध उत्पादनामधे भारतीय गीर गायीचा 80% वाटा असुन देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे. ब्राझील जागतिक बाजारात भारतीय गायी ब्राझीलीयन कॅटल
नावाने विकत आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन संकरीकरणावर तातडीने बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे. नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरुपी गमावुन बसू.
देशी गायीच्या दुधाचे फायदे
* दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः हाडांसाठी फायदेशीर असतं. हे तर आपल्याला ठाऊकच आहे, पाकिटाचे दूध पिण्याऐवजी देशी गायीचे ताजे A2 टाईप दूध पिण्याने तर आपल्याला वेगळे आणि बहुमूल्य फायदे मिळतील.
* एखाद्या मुलाचा किंवा व्यक्तीच्या बौद्धिक विकासासाठी देशी गायीचे दूध खूप फायदेशीर आहे. मेंदूसाठी अजून कोणतेही दूध देशी गायीच्या दुधा इतके फायदेशीर नाही.
* देशी गायीचे दूध पचनासाठी उत्कृष्ट असतं. ह्याला पचविण्यासाठी पचन तंत्राला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. पचन तंत्राच्या समस्यांमध्ये हे फायदेशीर आहे.
* पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असल्यास देशी गायीचे दूध पिणे एक प्रभावी उपाय आहे. देशी गायीचे दूध वीर्याला दाट करून शुक्राणूंची संख्या वाढवते आणि बळकट करते.
*दररोज देशी गायीच्या दुधाचे सेवन करणे टीबी (क्षयरोगाचा) च्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं. त्याच बरोबर दररोज रात्री नियमाने देशी गायीच्या दुधाचे सेवन केल्याने आबाळ वृद्धांना देखील बळ मिळतं.
* पित्ताशी निगडित सर्व समस्यांच्या निरसनासाठी देशी गायीचे दूध खूप फायदेशीर आहे. हे शरीराला तेज आणि शक्ती (ओज ) देतं. गॅसच्या त्रासांपासून सुटका मिळतो.
* लहान मुलांमध्ये मुडदूस (रिकेट्स) झाल्यास देशी गायीचे दूध बदामासह घेतल्यास हे औषधाप्रमाणे काम करतं. हे रक्तपेशींना वाढविण्यास मदत करते.
* चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी देशी गायीच्या दुधाचा वापर केला जातो. देशी गायीच्या कच्च्या दुधाने चेहऱ्यावर मालिश केल्याने त्वचा नितळ, तजेल आणि स्वच्छ होते.
* गायीच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे. जे डोळ्यांची दृष्टी वाढवून डोळ्यांचे सौंदर्य वाढवतं.
* कर्करोग, टीबी, कॉलरा सारख्या गंभीर रोगांवर देशी गायीचे दूध अमृत मानले गेले आहे. मुलांना संपूर्ण प्रकारे पोषण देण्यासाठी हा एकमेवच पदार्थ सक्षम आहे. कारण दूध एक संपूर्ण आहार आहे.
* औषधांच्या रसायनामुळे शरीरामध्ये बनणारे विष आणि त्यांचा आपल्या शरीरांवर होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रभाव कमी करण्यासाठी देशी गायीचे दूध प्रभावी आहे.