ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

दिल्लीत महाराष्ट्रातील राजकीय खलबतांना वेग, मंत्रिमंडळ विस्ताराला गती?

Spread the love

दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी सुरुवातील बैठक झाल्यानंतर अमित शाह यांच्या कार्यालयात बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची स्थिती, सहकारी कारखान्यांचे नवे धोरण ठरविण्यासाठीची चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते. सहकाराचे नवे धोरण केंद्र सरकार आणणार आहे, त्याबाबतची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. त्यासाठीच भाजपामधील सहकार क्षेत्राचे नेते रणजीतसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती.

थिंक टँक : नाना हालंगडे 

दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय खलबतांना वेग आल्याचा अंदाज आहे. या बैठकीतच मंत्रिमंडळ विस्ताराला गती देण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी बोलाविलेल्या सहकार क्षेत्रासंबंधीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र सहकार क्षेत्रासोबतच इतर सर्वच चर्चा होतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इतर चर्चांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हे विषय महत्त्वाचे आहेत, असेही सांगण्यात आले.

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सहकार क्षेत्र आणि साखर उद्योगामध्ये सुधारणा करायच्या आहेत. त्यासंबंधीची आज चर्चा होणार आहे. सहकार क्षेत्राची बैठक होत असताना राज्यातील इतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे किंवा इतर कोणत्याही पक्षातील नेत्यांचे नुकसान व्हावे अशी आमची भूमिका नाही.

दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी सुरुवातील बैठक झाल्यानंतर अमित शाह यांच्या कार्यालयात बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची स्थिती, सहकारी कारखान्यांचे नवे धोरण ठरविण्यासाठीची चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते. सहकाराचे नवे धोरण केंद्र सरकार आणणार आहे, त्याबाबतची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. त्यासाठीच भाजपामधील सहकार क्षेत्राचे नेते रणजीतसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती.

राज्यपालांबाबत पंतप्रधान निर्णय घेणार

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सहकार क्षेत्र आणि साखर उद्योगामध्ये सुधारणा करायच्या आहेत. त्यासंबंधीची आज चर्चा होणार आहे. सहकार क्षेत्राची बैठक होत असताना राज्यातील इतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे किंवा इतर कोणत्याही पक्षातील नेत्यांचे नुकसान व्हावे अशी आमची भूमिका नाही. सहकार क्षेत्रासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. तसेच राज्यपालांच्या राज्य सोडण्याच्या इच्छेबाबत प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यपालांच्या इच्छेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.’

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास चांगलेच

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलत असताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुतोवाच केले होते. एका मंत्र्यांवर अनेक खात्याची जबाबदारी आहे, अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. विशेषतः अधिवेशन काळात विधानसभा आणि विधानपरिषदेत उत्तर देताना मंत्र्यांची बरीच धावपळ होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास चांगलेच होईल.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका