थिंक टँक : नाना हालंगडे
उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दारु, सिगारेट आणि ड्रग्स यापासून सगळ्यांनी दूर राहायला हवं, व्यायाम करायला हवा. त्यासोबतच आहार उत्तम ठेवायला हवा. निरोगी जीवन जगण्याचा हक्क सर्वांना आहे आणि तो मिळालाच पाहिजे. दिनक्रम सकाळी लवकर सुरू करा, वाईट व्यसनांपासून लांब रहा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, दारू, सिगारेट, ड्रग्सपासून सर्वांनीच दूर राहायला हवं. निरोगी आयुष्य आपण जगावं. तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करावा. आहार ही उत्तम ठेवावा. कोरोनाची खबरदारी बाळगूनच आपण वावरायला हवं. अजून ही काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. याचा विसर पडू देऊ नका. पैशापेक्षा आरोग्य महत्वाचं आहे, हा धडा आपल्याला कोरोनाने दिलेला आहे. हे विसरून चालणार नाही.
निसर्गाचं चक्र बदलेले आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आता पुढं पुढं सरकत आहेत. आता वातावरणातील छोट्याश्या बदलाने लोक आजारी पडतायेत. वेगवेगळे व्हायरस पसरत आहेत. यामुळं प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागलेली आहे. आता नवनवे शब्दप्रयोग सहज तोंडात येतायत, हा व्हायरल आजार आहे. असं अगदी सहज बोलू लागलेत. या निसर्गाच्या चक्रातून निर्माण होणाऱ्या आजारांपासून दूर राहायचं असेल तर सकस आहार घ्या, व्यसनापासून कोसो दूर रहा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
राज्यात महागाई आणि बेरोजगारी हा महत्वाचे मुद्दे आहेत. त्याकडे लक्ष देण्याऐवजी असे नामांतराचे मुद्देवर काढले जातात. मग अशा मुद्द्यावर आम्हाला ही बोलावं लागतं, बोललो नाही तर आम्हाला महापुरुषांबद्दल काही वाटत नाही असं म्हणतात. अशावेळी मूळ पुणेकरांची अपेक्षा पाहायला हवी, बाहेरच्यांनी अशी मागणी केली तर अडचणीचं ठरतं. सगळी नावं चांगलीच आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. आता जगाच्या नकाशावर पिंपरी चिंचवडसुद्धा पुण्याच्या अंडर दाखवलं जातं. आत्ता महत्वाचे प्रश्न बाजूला ठेऊन, वेगळेच मुद्दे बाजूला आणू नयेत. यासाठी समंजस भूमिका दाखवायला हवी, असंही ते म्हणाले.
हेही वाचा