दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
थिंक टँक न्युज नेटवर्क / नाना हालंगडे
दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे. सर्व पेपर्स सकाळी १०.३०वाजता सुरू होणार आहेत.”या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. मागील काळात जसे पेपर घेत होतो, तशाच पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे,” असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
दहावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक:
१५ मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
१६ मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा
१९ मार्च – इंग्रजी
२१ मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा)
२४ मार्च – गणित भाग – १
२६ मार्च – गणित भाग २
२८ मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर १
४ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर २
बारावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक
४ मार्च – इंग्रजी
५ मार्च – हिंदी
७ मार्च – मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलुगू इ.
८ मार्च – संस्कृत
९ मार्च – वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
१० मार्च – भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र
११मार्च – चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
१२ मार्च – रसायनशास्त्र
१४ मार्च – गणित आणि संख्याशास्त्र
१५ मार्च – बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
१६ मार्च – सहकार
१७ मार्च – जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास
१९ मार्च – भूशास्त्र, अर्थशास्त्र
२१ मार्च – वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म
२२ मार्च – अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण