“त्या” काळवीटाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
वनविभागाने जागेवरच अग्नी दिला; हबिसेवाडी मृत्यू प्रकरण
थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील पारे-हबिसेवाडी हद्दीतील सोनार मळा येथील म्हैसाळ पोटकॅनालमध्ये एक ते दीड वर्षाच्या काळवीटाचा शनिवार, 1 ऑक्टोंबर रोजी मृतदेह सापडला. त्याची दृगंधी उठली होती. वनविभागाने त्याचे शवविच्छेदन न करताच पडलेल्या ठिकाणापासून 15 फूट अंतरावर अग्नी दिला. त्यामुळे वन्यप्राणी मरूनही त्याचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. हेही मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल.
सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख
गांधी जयंतीच्या आदल्या दिवशीच सांगोला तालुक्यातील पारे-हबिसेवाडी येथील म्हैसाळ योजनेच्या पोटकॅनॉलच्या काळवीटाचा फुगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडाला, पण वन विभागाने नुसतीच बघ्याची भूमिका पार पाडली. काळवीट मोठ्या प्रमाणात फुगले होते. दुर्गंधीही सुटली होती. येथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी कोणतीच तसदी न घेता त्याच ठिकाणी त्याला अग्नी दिला. एवढी मोठी घटना घडली असतानाही वनपरिक्षेत्र अधिकारी भाठे इकडे फिरकलेही नाहीत. खरे तर काळवीटाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.
दुर्गंधी सुटल्याने तसेच मोठ्या प्रमाणात पोटफुकी पहावयास मिळाल्याने याचा मृत्यू दोन ते तीन दिवस अगोदरच झालेला असावा,असेच घटनास्थळी भेट दिलेल्या अनेक जणांनी सांगितले.
मोठे शिंगटी असलेले एक ते दीड वर्षाचे नर जातीचे हे काळवीट मेलेले आहे. खरे तर वन विभागाने पंचनामाच केला; पण कशाने मृत्यू झाला,यासाठी त्याचे शवविच्छेदन न करताच
जाळून टाकण्याची घाई केली. त्यामुळे याच काळवीटाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असेच राहिले आहे.
सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्र आहे. वनसंपदे बरोबर वन्यप्राणी,विविध प्रकारचे पक्षी यांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे. पण वन विभाग मात्र सुस्तावला आहे. कोणीही वने नष्ट करीत आहे. मोठ्या प्रमाणात शिकारी होत आहेत,त्यामुळे अनेक प्राण्यांची शिकार होत आहे.
परवाच्या काळवीटाच्या मृत्यूनंतर स्पष्टच झाले आहे.याच काळवीटाचा अचानक मृत्यू होणे,ही पहिलीच घटना आहे. तरीही सांगोला वन विभागाने हे गाभिर्याने घेतले नाही.त्यामुळे काळवीट मृत्यू प्रकरण,समजू शकले नाही.
पाहा खास व्हिडिओ