“त्या” असाह्य बहीण-भावाची दिवाळी झाली गोड
"भाईंची देवराई" प्रतिष्ठानतर्फे फराळ वाटप
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.आबासाहेब यांच्या कार्याचा वसा जपित भाईंची देवराई प्रतिष्ठान सतत वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. अशातच समाजातील रंजल्या गांजल्या कुटुंबियांना हातभार लावणे, हे आपले आद्य कर्तव्य समजत आहे. डिकसळ गावातील दोन्ही अपंग असलेल्या बहीण-भावाची दिवाळी फराळ देत, यांची दिवाळी गोड केली. तर पुतण्या इंजिनियर सतिश यादव यांनी व्हींलचेर देत घरच एन् दिवाळीत प्रकाशमय केले.
डिकसळ येथील अपंग असलेल्या बहीण- भावाची कहानी दर्दाभरी अशी आहे. दोघेजणही अपंग आहेत. सुभाष पिठ मळतो अन् कमला अपंग हाताने भाकऱ्या थापते. असेच यांचे रोजचे जीवनमान आहे. त्यामुळे यांच्यात दिवाळी कुठली अन् काय? याचीच काळजी देवराई प्रतिष्ठानच्या सदस्यांना लागल्याने त्यांना रविवार 23 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी फराळ देण्यात आला.
त्याच दरम्यान कमल यांचे पुतणे,पुणे येथे वास्तव्यास असलेल्या इंजिनियर सतिश यादव यांनी आजच सायंकाळी त्यांच्या घरी येवून,त्यांचे घर प्रकाशमय केले. तर कमलासाठी नवी कोरी व्हीलचेअरही भेट दिली. यांच्या उभ्या आयुष्यात कधी घरात लाईट नव्हती. ती ऐन दिवाळीत पुतण्यामुळे पहावयास मिळाली. याच अपंग असलेल्या सुभाषचे वय 65 वर्षाचे तर कमला 56 वर्षाची आहे. गावापासून यांचे घर एक किलोमिटर इतक्या अंतरावर आहे.
घरही संपूर्णपणे गळके असेच आहे. खूप लाजिरवाणे असेच जिणेच हे कुटुंबीय जगत आहेत. आज भाईंच्या देवराई प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी फराळ, गावचे रेशन दुकानाराने दीपावली किट ही याच वेळी दिले. तर पुतण्याने ऐन दिवाळीत यांचे घर प्रकाशमय केले.
यावेळी इंजिनियर सतिश यादव, बंडू वाघमोडे, अप्पासाहेब भुसनर, पोलिस पाटील तथा रेशन दुकानदार अनिल कुलकर्णी, पंचू गायकवाड यांच्यासह देवराई प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.