ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनमाध्यमविश्वरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञान
तुमच्या घरातील हे चॅनल्स होणार बंद
केंद्र सरकारचा दणका, वाचा नेमके काय आहे प्रकरण
Think Tank News Network
तुमच्या घरातील टीव्हीवर ‘डीडी फ्री-डिश’ या फ्री-टू-एअर सेवेअंतर्गत आपण मोफत पाहत असलेल्या १० वाहिन्या आता दिसणार नाहीत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.(Ministry of Information and Broadcasting)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘डीडी फ्री-डिश’ ही फ्री-टू-एअर सेवा आहे. फ्री-डिश टीव्हीवर कोणत्याही शुल्काशिवाय वाहिन्यांचे प्रसारण होते. झी मीडिया समूहातील 10 वाहिन्या डीडी फ्री-डिशवर सुरु आहेत. या वाहिन्या GSAT-15 सॅटेलाइटच्या सी-बँडमधून अपलिंक आहेत. त्याशिवाय, या वाहिन्या डिश टीव्हीवरदेखील आहेत. या वाहिन्या सॅटेलाइटच्या KU बँडपासून अपलिंक आहेत. डीडी फ्री-डिशचे 40 दशलक्षहून अधिक ग्राहक आहेत. त्यामुळे डीडी फ्री-डिशवर असलेल्या खासगी वाहिन्यांना फायदा होतो.
प्रतिस्पर्धी वृत्तवाहिन्यांनी ट्राय आणि रेटिंग एजन्सी बार्क इंडियाकडे (BARC India) याबाबत तक्रार दाखल केली होती. डीडी फ्री-डिशवर झी समूहाच्या वाहिन्या मोफत असल्याने त्यांचा ‘ चुकीच्या पद्धतीने फायदा’ मिळाला आहे, असा आक्षेप अन्य वाहिन्यांनी घेतला होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याची दाखल घेऊन अखेर झी समूहाला कारणे दाखवा नोटीस बजावली. 23 सप्टेंबर रोजी आदेश जारी करत झी समूहातील 10 वाहिन्यांची परवानगी रद्द केली.
या निर्णयामुळे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील लहान न्यूज ब्रॉडकास्टर्सना फायदा होणार आहे.
10 वाहिन्या होणार बंद
झी हिंदुस्थान, झी राजस्थान, झी पंजाब हरियाणा हिमाचल, झी बिहार-झारखंड, झी छत्तीसगड, झी उत्तर प्रदेश-उत्तराखंड, झी सलाम, झी 24 कलाक, झी 24 तास आणि झी ओदिशा ( सध्याचे दिल्ली एनसीआर हरियाणा) याा वाहिन्यांसाठी आदेश जारी केले आहेत.
अशा प्रकारचा दुहेरी लाभ कोणालाही घेता येणार नाही. झी मीडियाने कोणत्याही एका बँडवर रहावे असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र, झी मीडियाने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर केंद्र सरकारने झी मीडियाच्या 10 वाहिन्यांना GSAT-15 च्या KU बँडवरून हटवण्याचे आदेश जारी केले आहेत.