तीन महिलांना ठार मारणारा आरोपी सापडला
शेतीचा बांध उठला जीवावर, कुदळीने घातले घाव
थिंक टँक / नाना हालंगडे
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील तीन महिलांना ठार मारणारा आरोपी अखेर पोलिसांना सापडला आहे. शेतीच्या बांधाचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
समाधान महादेव लोहार (वय 33 वर्षे, रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा) खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
नंदेश्वरच्या तिहेरी हत्याकांडाचा थरकाप
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील तिहेरी हत्याकांडात ठार झालेल्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तर एकजण या घरातील सून आहे. नराधमाने अत्यंत निर्घुणपणे दगडाचे घाव घालून एकापाठोपाठ एक असे तिघींना ठार केले. या तिघीही तडफडून जीव सोडला.
नंदेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक महादेव माळी यांच्या दोन बहिणी आणि सुनेची अज्ञात कारणाने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. महादेव माळी यांच्या मातोश्रीचे निधन काही दिवसापूर्वी झाले होते. यासाठी माळी यांच्या दोन विवाहित बहिणी शेतातील वस्तीवर राहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान महादेव माळी हे गावातील हॉटेलकडे तर त्यांचा मुलगा बंडू हा त्याच्या कापड दुकानाकडे गेल्यावर दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला.
दुपारी १२ ते २ च्या दरम्यान मृतातील एक महिला घराबाहेर कपडे धुवत असताना तिच्यावर या आरोपीने हल्ला केल्याचे सांगितले जातंय. नंतर दुसरी बहीण आणि सून पळून जात असताना त्यांच्यावरही हल्ला करून हत्या केली.
परिसरात भीतीचे वातावरण
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच घरातील तीन महिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
हे तिन्ही मृतदेह थोड्या फार अंतराच्या फरकाने पडले होते. मृतदेहाजवळ रक्ताचा थर साचला होता. घाव वर्मी बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याचे आढळून येत होते.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलांनी जीव सोडताना पाय खोडल्याचे दिसून येत होते.
तिहेरी खुनातील आरोपीस मंगळवेढा पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
मंगळवेढा पोलिसांनी काही वेळापूर्वी एक प्रेसनोट जारी केली आहे आहे. त्यात म्हटले आहे की, नंदेश्वर येथील लवटे वस्ती ता . मंगळवेढा येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी 1) दिपाली बाळू माळी वय 25 वर्ष, 2) पारुबाई बाबाजी माळी वय 55 वर्ष, 3) संगीता महादेव माळी वय 47 वर्ष, रा नंदेश्वर या तीन महिलांचा अज्ञात हत्याराने व दगडाने मारुन खून केला असल्याची माहिती मिळाली.
मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि सत्यजित आवटे , सपोनि अंकुश वाघमोडे , पोसई सौरभ शेटे , परि . पोसई धापटे , सपोफो अविनाश पाटील , पोहेकों दयानंद हेंबाडे पोहेकों सुनिल गायकवाड , पोना विठ्ठल विभुते , पोना विक्रम काळे , पोना बापु पवार , पोकों कैलास खटकाळे पोकॉ राजु आवटे यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन तेथील परस्थितीची पाहणी केली.
पोलीसांनी तेथील आजूबाजूच्या लोकांकडे सदर खून कोणत्या कारणासाठी झाला, कशामुळे झाला, कोणासोबत पुर्वीची भांडणे होती काय अशा सर्व बाबीच्या अनुशंगाने तपास केला. गोपनीय बातमीदाराच्या मार्फत चौकशी करुन संशयीत व्यक्ती समाधान महादेव लोहार (वय 33 वर्षे रा नंदेश्वर ता मंगळवेढा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले. परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
शेतीच्या बांधाच्या कारणावरुन व पूर्ववैमनस्यातून हातातील बेडग्याने (कुदळीने) तीन महिलाच्या डोक्यात मारुन व डोकीत दगड घालून जिवे ठार मारल्याचे सांगीतले आहे. सदर आरोपीस ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने करीत आहेत. सदर आरोपीस अटक केलेली आहे. सदर खून करण्यामागे इतर कोणते काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस विशेष महानिरीक्षक सुनिल फुलारी (कोल्हापुर परिक्षेत्र), पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे (सोलापूर ग्रामीण), अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, श्रीमती राजश्री पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी), पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुहास जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि अंकुश वाघमोडे , सपोनि बापू पिंगळे, पोसई सौरभ शेटे , परि पोसई धापटे , सपोफो अविनाश पाटील , सपोफो दत्तात्रय तोंडले , पोहेकों दयानंद बाडे पोहेकॉ सुनिल गायकवाड , पोना विठ्ठल विभुते , पोना विक्रम काळे , पोना बापु पवार , पोकॉ अजित मिसाळ , पोकॉ कैलास खटकाळे पोकॉ राजु आवटे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने , मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
हेही वाचा