तिसऱ्या लाटेचा धोका, बेड कधीही ताब्यात घेणार : पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र
पुणे : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पुन्हा गडद होताना दिसत आहे. अशातच पुणे महापालिकेने पुणे शहर व परिसरातील खासगी दवाखान्यांना पत्र पाठवून आम्ही कधीही बेड ताब्यात घेवू असे कळविले आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पुन्हा गडद होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यात दररोज कोरोन रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. पुणे महापालिकेने पुणे शहर व परिसरातील खासगी दवाखान्यांना पत्र पाठवून आम्ही कधीही बेड ताब्यात घेवू असे कळविले आहे.