ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

.. तर शेकाप तीव्र लढा उभारेल!

डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा इशारा

Spread the love

पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. सभागृहात आवाज उठवला. खाजगीकरण करण्याच्या धोरणाला कडाडून विरोध केला. खाजगीकरण झाले तर भविष्यात सामान्यांना खूप त्रास सहन‌ करावा‌ लागेल हे पटवून देत राहीले.. परंतु त्यावेळेस काहींनी त्याकडे राजकीय आकसाने पहात हे नेते व यांचे पक्ष विकासाला आडकाठी घालत आहेत असा कांगावा करीत राहीले.

थिंक टँक / नाना हालंगडे
केंद्रामध्ये व राज्यामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असो. त्या सरकारची ध्येय धोरणे शेतकरी, कष्टकरी, छोटे‌-मोठे व्यवसायायीक, बेरोजगार यांच्या प्रगतीची नसतील, शेतकऱ्यांच्या विरोधी असतील तर शेतकरी कामगार पक्षाने कायम त्या धोरणास विरोध केला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा विरोधासाठी विरोध कधीच करीत नाही. तर चुकीच्या धोरणास विरोध करीत असतो. शेतकरी, कामगारांच्या हितासाठी, त्यांच्या न्यायासाठी आम्ही आक्रमकपणे लढा देवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते स्व प्रा.एन.डी.पाटील‌-सर व स्व गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी कायम स्वरुपी शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, बेकार तरुण तरुणी यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले. पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. सभागृहात आवाज उठवला. खाजगीकरण करण्याच्या धोरणाला कडाडून विरोध केला. खाजगीकरण झाले तर भविष्यात सामान्यांना खूप त्रास सहन‌ करावा‌ लागेल हे पटवून देत राहीले.. परंतु त्यावेळेस काहींनी त्याकडे राजकीय आकसाने पहात हे नेते व यांचे पक्ष विकासाला आडकाठी घालत आहेत असा कांगावा करीत राहीले.

आज त्या खाजगीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येऊ‌‌ लागले आहेत. प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करण्याचा प्रयत्न हळूहळू सुरू आहेत. विकासाच्या गोंडस नावाखाली जे खाजगीकरण केले जात आहे ना, त्यातून फक्त नि फक्त ठराविक उद्योगपतींचा विकास होताना दिसत आहे..

केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे की..विकास साधत असताना सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे… तो सर्वांगीण विकास हा शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. तो खरा विकास..इथे मात्र मोठमोठ्या उद्योगपतींना हाताशी धरुन त्यांच्या फायद्यासाठी काही आराखडे जाणून – बुजुन आखले जात आहेत. त्यामध्ये आपल्या राज्यातले उद्योग इतर राज्यांत हालवले जात आहेत..

सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी खाजगीकराचा डाव आखला जात नाही.. जसे पचेल तसे … लोकांना स्विकारण्यास भाग पाडले जाते हळूहळू खाजगीकरणाचा विळखा आवळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

गेले काही दिवसांपूर्वी एस.टि.महामंडळाच्या खाजगीकरणाचा घाट घातला गेला होता.त्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी फार मोठे आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तात्पुरते का होईना एसटीचे खाजगीकरण करण्याचा डाव स्थगीत करावा लागला.

तसेच गेल्याच आठवड्यात विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विजवितरण कंपनीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आंदोलन पुकारले. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. सरकारने मध्यस्थी करुन ते आंदोलन स्थगित करायला लावले. विज‌मंडळाचे खाजगीकरण करण्याचा डाव का आखला जात आहे .. त्याचा फायदा कोणाला व तोटा कोणाला हे समजून घेतले पाहिजे.

जर का विज वितरण कंपनीचे खाजगीकरण झाले तर जे कर्मचारी कामावरती आहेत त्यातील काही कर्मचाऱ्यांवरती गंडांतर येणार आहे. काही कर्मचारी घरी बसवले जातील व त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ येईल. सद्या कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी व मागण्यासाठी लोकशाही मार्गाने दाद मागता येते.

खाजगीकरण झाल्यावरती आशी दाद मागता येणार नाही..कारण ते विजमंडळ खाजगी मालकीचे असेल. कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनाबाबत तक्रार करता येणार नाही.. ते ठरवतील तोच पगार कर्मचाऱ्यांना‌ मिळणार..कारण त्या मालकावरती कोणाचे नियंत्रण असणार नाही. आपण सरकारमान्य धान्य दुकानदाराला वेळेबाबत, दराबाबत विचारणा करु शकतो परंतु खाजगी दुकानदाराला आपण काहीच बोलु शकत नाही कारण तो तया त्या दुकानाचा स्वतः मालक असतो.

खाजगीकरणाचा तोटा शेतकरी,लहान व्यवसायीक, घरगुती विज ग्राहकांना बसू शकतो..जर आज आपण विजेची थकबाकी आर्थिक अडचणींमुळे भरली‌ नाही तर आपण त्या थकबाकीचे ठरावीक रकमेचे हाप्ते करुन भरु शकतो. आपणास काही प्रमाणात सवलत मिळू शकते. परंतु खाजगीकरण झाले वरती विज बिल एक दिवसाचे ही आपण थकवु शकणार नाही. मग आपणास कितीही नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागले. किंवा शेतीमालाल योग्य भाव मिळाला नाही तरी ते बिल आपणास भरावेच लागणार अन्यथा विज तोडली जाणार.त्या विरोधात आवाजही उठवता येणार नाही.आशा खाजगीकरणाचा फटका विज कर्मचाऱ्यांना नव्हे तर सामांन्य नागरीकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

खाजगीकरणाची ही प्रक्रिया हळूहळू पुढे सरकत गेली व‌ नागरीक काहीच न बोलता निमुटपणे हे सहन करु लागली तर प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. येणाऱ्या काळात जर का सत्तेच्या जोरावरती शेतीचे खाजगीकरण झाले तर नवल वाटुन घेऊ नका. शेतीवरील तुमची मालकी संपुष्टात आणन्याचा प्रयत्न होऊ शकतो.कंत्राटी शेती हा त्याचाच एक भाग आहे.. येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहुन खाजगीकरणास विरोध करावा. माझा काय संबंध, मला काय याचं देणं घेणं अशा मानसीकतेत राहु नका.

स्व.प्रा.एन डी पाटील -सर व स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी जसा खाजगीकरणाच्या धोरणास शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विरोध केला तोच विरोध शेतकरी कामगार पक्ष आमदार जयंतभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजही करीत आहे..

येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्ष व‌ पुरोगामी युवक संघटना खाजगीकरणाच्या विरोधात राज्यभर आंदोलन उभे करेल.व हे खाजगीकरणाचे भुत घालवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजेल असा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी दिला.


काही खास

जेनेरिक औषधे इतकी स्वस्त कशी?

स्वराज्यरक्षक संभाजी आणि इतिहासाचे अवजड ओझे

एनडीटीव्ही : भारतीयांच्या अपेक्षेचेही अधिग्रहण

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका