सांगोला/नाना हालंगडे
कर्नाटक येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप स्पर्धेत डोंगरगाव (ता. सांगोला) येथील बॉडीबिल्डर संकेत संजय काळे याने रौप्य पदक जिंकून नॅशनल चॅम्पियनशिप प्राप्त केली. त्याच्या कामगिरीबद्दल सोलापूर जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
सदरची स्पर्धा येनेपोया डिम्ड. टू. बी. युनिव्हर्सिटी मेंगलोर, कर्नाटक येथे संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील सर्व युनिव्हर्सिटीचे बॉडीबिल्डर सहभागी झाले होते. त्यात सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणेचे नेतृत्व करत डोंगरगाव (ता. सांगोला) येथील बॉडीबिल्डर संकेत संजय काळे याने या स्पर्धेत सहभाग नोंदवून शालेय नॅशनल चॅम्पियनशिपवर आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले आहे.
या यशाबद्दल सर्व स्तरामधून क्रीडाप्रेमी, पालक, सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळी यांच्याकडून त्याचे कौतुक होते आहे.
यापूर्वीही इंडियन बॉडी बिल्डर अँड फिटनेस फेडरेशनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेतही जुनियर “भारतश्री”होण्याचा मान बॉडीबिल्डर संकेत संजय काळे यांनी मिळवला आहे.
या स्पर्धां व्यतिरिक्त विद्यापीठस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन 25 पेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी संकेत हा रोल मॉडेल ठरला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा