डॉ. सतीश साळुंखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

रविवारी अपघातात झाले होते निधन

Spread the love

जवळा (विशेष प्रतिनिधी) : जवळा (ता. सांगोला) येथील सुप्रसिद्ध डॉ. सतीश साळुंखे यांच्यावर जवळा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी कार अपघातात त्यांचा मृत्यु झाला होता.

अंत्यसंस्कारवेळी डॉ. साळुंखे यांच्या कुटुंबियांसह माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील, युवानेते यशराजे साळुंखे-पाटील, भाजप नेते लालासाहेब देशमुख, उपसरपंच नवाज खलिफा, पोलिस पाटील अतुल गयाळी, शिंत्रे सर, नारायण गावडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार आदी उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील असंख्य डॉक्टरही उपस्थित होते.

संबंधित बातमी

जवळ्यातील डॉ. सतीश साळुंखे यांचे अपघाती निधन

https://manavataexpress.in/?p=3607

रस्ते कामाने केला घात
डॉ. सतिश साळुंखे हे रविवारी रात्री सिंगणहळ्ळी येथून जवळ्याकडे स्वीफ्ट डिझायर कारने येत होते. त्यांची कार सोनंद रस्त्याने येत असताना रस्ता कट होताच वळण घेत असताना झाडाला जाऊन धडकली. कारचा वेग जास्त होता. मध्येच रस्ता कट होऊन नवीन रस्ता सुरु होण्याच्या ठिकाणीच त्यांचा कारवरील ताबा सुटला. भरधाव कार झाडावर जाऊन आदळली.

जेसीबीने तोडावी लागली कार
भरधाव वेगातील कारने झाडाला धडक दिल्याने कार निम्मी झाडात अडकली होती. सर्व दरवाजे लॉक झाले होते. कारचा निम्मा भाग चेंदामेंदा झाला होता. अशा स्थितीत डॉ. साळुंखे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना कारबाहेर काढण्यासाठी घटनास्थळावरील लोकांनी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र परिस्थिती खूपच गंभीर बनल्याने जेसीबी आणून कारचा भाग तोडून डॉ. साळुंखे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना अतिगंभीर अवस्थेत सांगोल्याला उपचारासाठी नेण्यात आले. उपचारावेळीच ते मृत झाले.

जवळा गाव शोकसागरात
डॉ. साळुंखे यांच्या अपघाती निधनाची ही दुर्दैवी बातमी समजताच जवळा गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली. सकाळी गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर जवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

झाडाला जोराची धडक
सिंगनहळ्ळी येथे रविवारी रात्री त्यांची स्विफ्ट डिझायर कार झाडाला धडकली. या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले. झाडाला बसलेली धडक एवढी गंभीर होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. कारचे दरवाजे तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.

हसतमुख, मदततीला धावणारे व्यक्तीमत्व
डॉ. साळुंखे यांनी अत्यंत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बनाळी (ता. जत) येथे झाले. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जवळा येथे साळुंखे क्लिनीक हा दवाखाना सुरु केला होता. ते सतत हसतमुख असायचे. इतरांना मदत करण्याची त्यांची भावना होती. त्यांच्या जाण्याने जवळ्यातील एक आदर्श डॉक्टर, आदर्श सुपूत्र हरपला आहे.

“मानवता एक्सप्रेस”, थिंक टँक डिजिटल मीडिया”कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका