डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या कार्यपध्दतीचा विरोधकांनाही हेवा : अजिंक्यराणा शिंदे
सांगोला : स्व. भाई गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेबांच्या कामाची तुलना कोणत्याही पक्षातील राजकीय नेत्यांच्या कामाशी करता येत नाही. मात्र त्यांच्या कामाचे अनुकरण जर का राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी केल्यास त्यांचेही राजकीय सामाजीक क्षेत्रातले काम नक्कीच ऊल्लेखनीय होईल. सांगोल्यामध्ये त्याचाच अनुभव येत आहे. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे मोठे नातू युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख हे स्व. आबासाहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकुन सामाजिक व राजकीय क्षेत्रामधाये काम करीत आहेत.
डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची अभ्यासू वृत्ती, शांत स्वभाव, जनमानसात मिसळण्याची सवय, सतत जनसंपर्क यामुळे तर ते स्व.आबासाहेबांच्या विचारावरती काम करीत आहेत असे तालुकावासीय जनतेला वाटू लागले आहे.
खरेच अगदी हुबेहुब आबासाहेबांसारखेच बोलणे, बाँडी लँगवेज, कामाची पध्दती ही आबासाहेबांची आठवण करुन देत आहेत. संपूर्ण तालुक्यातील सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख हे जाऊन भेटी देत आहेत. जर सुखाचा आनंदाचा कार्यक्रम असेल तर त्या आनंदामध्ये सामील होत आहेत. जर दुःखद कार्यक्रम आसेल तर त्या कुटुंबाला भेटुन त्यांचे सांत्वन करुन आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कोरोनासारख्या कठिण काळात तर त्यांचे काम ऊल्लेखनीय आहेच. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या तालुकाभर भेटीमुळे विरोधक सुध्दा त्यांचेच आनुकरण करुन जमेल तेवढे लोकांना भेटत आहेत. डॉ. बाबासाहेब देशमुख साहेबांच्या यांच्या याच कामाच्या पध्दतीचा विरोधकांना सुध्दा हेवा वाटत आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यामुळे तेही तसेच अनुकरण करु लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही का असेना डॉ. बाबासाहेब यांच्यामुळे सांगोल्याच्या राजकारणात उत्साह संचारला आहे.
शब्दांकन
मा. अजिंक्यराणा शिंदे
युवक नेते, बलवडी, ता.सांगोला