ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षणशेतीवाडी
Trending

डिकसळ आश्रमशाळेचा व्हॉलीबॉल संघ तालुक्यात अव्वल

वैष्णवी हालंगडेचे नेतृत्व जिल्हास्तरावर नेणारे

Spread the love

सांगोला/ विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील आश्रमशाळेच्या तिनही संघांनी नेत्रदीपक कामगिरी करत तालुकास्तरावर तिन्ही वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला.

डिकसळ आश्रमशाळेच्या व्हॉलीबॉल संघाची विजयी परंपरा सन 2014 पासून राज्यभर अधोरेखित आहे. आताही कालच झालेल्या तालुक्यास्तरीय स्पर्धेतील वयोगट १४,१७ आणि १९ वर्षाखालील तिन्ही संघांनी नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धासाठी तालुक्यातील शालेय स्तरातील वीस संघांनी सहभाग नोंदविला होता. १४ वयोगटातील मुलींच्या संघांनी अंतिम सामन्यात नाझरा विद्यामंदिर प्रशालेवर दोन शून्यने विजय मिळविला.

डिकसळ आश्रमशाळेचे संघ 2014 सालापासून मैदानी खेळात तालुक्यात अव्वल ठरत आहेत. विशेष म्हणजे व्हॉलीबॉल संघांनी आतापर्यंत राज्यभर याच स्पर्धा चांगल्या गजविल्या आहेत. काल सांगोल्यातही झालेल्या स्पर्धेत तिन्हीही संघांनी नेत्रदीपक कामगिरी करीत, यशाला गवसणी घातली. याच संघाची जिल्हा स्तरासाठी आता निवड झाली आहे. यातील सर्वच यशस्वी खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक याचे योगदान मोलाचे आहे. आमची शाळा खेळाबरोबरच सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. – तुकाराम भुसनर, मुख्याध्यापक डिकसळ

१७ वयोगटातील मुलींच्या संघांनी याच प्रशालेचा दोन शून्यानेच अंतिम सामन्यात पराभव केला. तर १९ वर्षीय संघाने सांगोला विद्यामंदिर संघावर दोन शून्यने मात केली. १९ वर्षीय संघाचे नेतृत्व वैष्णवी नाना हालंगडे हिने केले होते.

१७ वर्षीय संघाचे नेतृत्व अपेक्षा शिंदे तर १४ वर्षीय संघाचे नेतृत्व कोमल व्हरगर हिने केले होते. या तिघींच्या नेतृत्वामुळे डिकसळ आश्रमशाळेचे नाव कालच्या या स्पर्धेमुळे तालुक्यात चर्चिले गेले आहे.

याच तिनही संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धा ११ डिसेंबर रोजी मोहोळ येथे होणार आहेत. याच सांगोला येथील स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने आयोजित केल्या होत्या.

या तालुकास्तरीय स्पर्धा सांगोला येथील क्रीडा संकुलात मागील दोन दिवसांपासून सुरू होत्या. त्याचा समारोप काल झाला. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, तालुका क्रीडा संयोजक प्रा.डी.के. पाटील यांच्यासह सर्वच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच डिकसळ आश्रमशाळेच्या संघाला क्रीडाशिक्षक भारत यादव, काकासाहेब करांडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी संघाचे मुख्याध्यापक तुकाराम भुसनर सर, शिवाजी कुंभार सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, सचिव प्रा.रानोबा करांडे यांच्यासह सर्व संचालकांनीही अभिनंदन केले.

डिकसळ आश्रमशाळेचे संघ 2014 सालापासून मैदानी खेळात तालुक्यात अव्वल ठरत आहेत. विशेष म्हणजे व्हॉलीबॉल संघांनी आतापर्यंत राज्यभर याच स्पर्धा चांगल्या गजविल्या आहेत. काल सांगोल्यातही झालेल्या स्पर्धेत तिन्हीही संघांनी नेत्रदीपक कामगिरी करीत, यशाला गवसणी घातली. याच संघाची जिल्हा स्तरासाठी आता निवड झाली आहे. यातील सर्वच यशस्वी खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक याचे योगदान मोलाचे आहे. आमची शाळा खेळाबरोबरच सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे, असे मत तुकाराम भुसनर (मुख्याध्यापक डिकसळ) यांनी व्यक्त केले.

भन्नाट व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका