डिकसळमधील जवळेकर कुटुंबीयांना ६ हजार रुपये खाऊटी निधी मंजूर
आपुलकी प्रतिष्ठानेही जमा केली १२ हजारांची मदत
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील सुखदेव जवळेकर यांचे निधन झाल्यानंतर हे कुटुंब उघड्यावर पडले होते. याबाबतचे वृत्त थिंक टँकने प्रसिद्ध केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. गावचे सरपंच चंद्रकांत करांडे यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अन्न धान्य खाऊटी निधी म्हणून तात्काळ ६ हजार रुपये मंजूर करून घेतले.
सुखदेव जवळेकर गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. दोन वेळच्या अन्नचीही यांना भ्रांत आहे. अश्यातच थिंक टँकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. यासाठी आपुलकी प्रतिष्ठाने पुढाकार घेतल्याने मदत निधी ही वाढू लागला.
अशातच गावचे सरपंच चंद्रकांत करांडे यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के निधी मधून ६ हजार रुपये निधी तात्काळ मंजूर करून घेतला.
डिकसळ येथील कै. सुखदेव जवळेकर कुटुंबासाठी मदत
1) डॉ. मंगेश लवटे..1500/-
2) हमीभाई इनामदार 1000/-
3) राजेंद्र यादव 500/-
4) सिताराम पाटील चित्रकार 500/-
5) इंजि. लक्ष्मण बेहेरे (हल्ली मुंबई ) 1000/-
6) चंद्रकांत करांडे (सरपंच डिकसळ )- 1000/-
7) गणेश नवले (SBI मालवण)-1000/-
8) किसान टायर्स -459/-
9) डॉ. मच्छिन्द्र सोनलकर -1000/-
10) इंजि. रमेश जाधव -1000/-
11) जय श्रीराम -2000/-
असे एकूण 10 हजार 959/ रुपये जमा झाले आहेत.